पिंपरी-चिंचवडमध्ये फटाका स्टॉलचा ‘धमाका’ सेटिंगवर

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाका स्टॉलचा ‘धमाका’ सेटिंगवर
Updated on

पिंपरी : वर्षानुवर्षे शहरात बेकायदा फटाके स्टॉल खुलेआम लावले जात आहेत. परवानगी घेणारे मोजके अन्‌ अनधिकृत दुकाने थाटणारे शेकडो, अशी परिस्थिती आहे. किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे दुकानदारांचे फावले आहे. आलिशान दुकाने मांडून नागरिकांचा जीव धोक्‍यात घातला जात आहे. पोलिसांचे लागेबांधे अन्‌ हप्तेखोरीच्या नावाखाली सुरू असलेल्या सेंटिग बादशहामुळे अनधिकृत स्टॉलवाले जोमात आहेत. मात्र, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका व पोलिस प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना सतावत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात दरवर्षी गल्लीबोळात अनधिकृत दुकाने थाटली जात आहेत. हंगामी स्वरूपात फटाका स्टॉलवाल्यांना १९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सध्या संत तुकारामनगर, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, भोसरीसह अनेक भागांत अनधिकृत स्टॉल उभारले गेले आहेत. कोरोनामुळे या वर्षी स्टॉलची संख्या कमी झाली आहे. महापालिका, अग्निशमन विभाग, पोलिस प्रशासन या सर्व परवानग्या स्टॉलसाठी असणे गरजेचे आहे. आत्तापर्यंत अग्निशमन विभागाकडून केवळ ३५ ‘नाहरकत’ दाखले दिले आहेत. मात्र, याच भागात संत तुकारामनगर पोलिस चौकीसमोर हाकेच्या अंतरावर अनधिकृत टोलेजंग फटाके स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, ‘अळी-मिळी गुपचिळी’ असा प्रकार सुरू आहे.

लिलावाचे नाटक कशासाठी?
दरवर्षी स्टॉलसाठी लिलाव जाहीर होतो. मात्र, त्यापूर्वीच दुकाने लागलेली असतात. विक्रेते या लिलावासाठी उपस्थितही राहत नाहीत. बऱ्याच स्वयंघोषित स्थानिक पुढाऱ्यांमधलाच अध्यक्ष चिठ्ठ्या टाकून जागांचे वाटप करतो. कोण कोठे स्टॉल लावणार, हे त्यांच्यामध्येच ठरते.

नेमकी जबाबदारी कोणाची  
बेकायदा फटाका दुकानदारांवर कारवाई नेमकी कोण करणार, हा मोठा प्रश्‍न आहे. महापालिका अतिक्रमण विभाग की पोलिस प्रशासन, यामध्ये गोंधळ आहे. महापालिकेला हा विसर पडला आहे की, अधिकृत परवानग्यांच्या माध्यमातून महापालिकेला मोठा महसूल जमा होऊ शकतो. मात्र, या विक्रेत्यांवर वचक नसल्याने गल्लीबोळातही दुकाने थाटली गेली आहेत.


हे नियम धाब्यावर 

  • इमारत आरसीसी पक्‍क्‍या बांधकामातील असावी
  • दुकान पूर्णत: रिकामे असावे
  • इमारतीच्या आसपास इतर ज्वालाग्रही वस्तूंचे गोडाऊन, साठा, दुकाने किंवा कारखाने असू नयेत
  • इमारतीचे छप्पर सिमेंट काँक्रीट स्लॅबचे असावे
  • पाण्याचे ड्रम, वाळूच्या बादल्या, पोत्याचा साठा व तत्सम उपकरणे 
  • अग्निशमन विभागाने पन्नास किलो साठा ठरवून द्यायला हवा
  • व्यवसाय परवाना व ‘नाहरकत’ दाखला
  • कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय
  • पोलिस व वाहतूक विभागाने स्थळदर्शन करणे गरजेचे
  • कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावावर अर्ज नसावेत
  • एकत्रितपणे एका जागी फटाका स्टॉलला परवानगी देणे चुकीचे
  • सर्व वीज जोडणी फायर प्रूफ असावी
  • गाळ्यांमधून बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा

स्टॉलवरचा भोंगळ कारभार 

  • आग प्रतिबंधक साधने, एबीसी मॉड्युलर नाहीत
  • ज्वालाग्रही पदार्थांना पॅकिंग नाही
  • धूम्रपान सर्रास 
  • दोनशे बॅरल पाण्याचा साठाही उपलब्ध नाही
  • स्टॉलच्या जागेत स्टोव्ह, शेगड्या, कंदील, चिमणीची दुकाने 
  • लहान मुलांनाही स्टॉलवर प्रवेश 
  • रस्त्यावर अतिक्रमण करून स्टॉलची उभारणी 
  • स्टॉलला फलक नाहीत 
  • मर्यादेपेक्षा जास्त फटाक्‍यांचा साठा
  • स्लॅबऐवजी कापडी मंडप
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com