Pimpri Unauthorized Flex : कुख्यात गुंड नीलेश घायवळचे झळकले अनधिकृत फ्लेक्स; गुन्हा दाखल

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या वाढदिवसानिमित्त चांदणी चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकले. हे फ्लेक्स उभारणे चांगलेच महागात पडले.
Nilesh Gayval Flex
Nilesh Gayval Flexsakal
Summary

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या वाढदिवसानिमित्त चांदणी चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकले. हे फ्लेक्स उभारणे चांगलेच महागात पडले.

पिंपरी - कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या वाढदिवसानिमित्त चांदणी चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्स झळकले. हे फ्लेक्स उभारणे चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोडलगत घायवळ तसेच इतर दोघांच्या वाढदिवसानिमित्त अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिस व पुणे महापालिकेच्या बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून हे फ्लेक्स हटवले. याप्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक काळुराम घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेशभाऊ घायवळ युथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Nilesh Gayval Flex
Pimpri Crime : तरुणीचा घातपात झाल्याचा संशय; अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार

निलेश हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक (मोका) कायद्यांतर्गत देखील कारवाई झालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com