कोरोनाच्या भीतीपोटी असंही कृत्य; मृतदेहच...

Moshi_Depot
Moshi_Depot

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोवर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास मृतदेह आढळला आहे. कचरा संकलित करून आणणाऱ्या डंपरमधून संबंधित मृतदेह डेपोवर आला आहे, अशी माहिती समजते. त्यामुळे कचरा गोळा करणाऱ्या आणि डेपोची देखभाल-दुरुस्तीसह कचरा प्रक्रिया करणाऱ्या ठेकेदारांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कचरा डेपोवर आज दिवसभरात आलेल्या गाड्यांचे डंपिंग करण्यात आले. त्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू होते. त्यावेळी जेसीबी चालकाला कचऱ्यामध्ये मृतदेह असल्याचे लक्षात आहे. त्याने संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत तात्काळ कल्पना दिली. मात्र, कोरोनाच्या भीतीने कोणीही मृतदेहाला बाजूला घेण्यास धजावले नाही. यानंतर स्थानिक भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह ताब्यात घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची महामारी शहरात सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात अशाप्रकारे मृतदेह कचरा म्हणून डेपोवर आणणे किंवा आलेल्या कचरा गाडीची तपासणी न करता डोळेझाक करणे याबाबत महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार? असा प्रश्न होत आहे.

'या' ठेकेदार कंपनीचा अक्षम्य कारभार 

पिंपरी- चिंचवडमधील कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर महापालिका प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. सध्या बीव्हीजी इंडिया आणि ए.जी इन्व्हायरो प्रा. लि. अशा दोन बड्या कंपनीकडे शहरातील कचरा गोळा करण्याचे काम आहे. तसेच, मुंबईतील अँथनी लारा इन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीकडे संपूर्ण कचरा डेपोचा ताबा आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम याच कंपनीकडे आहे. त्यामुळे कचरा डेपोच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गाड्यांची पाहणी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कचरा संकलित करणाऱ्या गाडीत काय आहे, नाही याची शहानिशा केली नाही. तसेच, कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या गाड्यांमध्ये कचरा भरला जातोय की मृतदेह? याची शहानिशा केली जात नाही. काही महिन्यांपूर्वी कचरा संकलन गाडीत वाळू भरल्याची बाब चव्हाट्यावर आली होती. आता कचरा म्हणून मृतदेह उचलून आणला आणि नागरी आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना महापालिका प्रशासन पाठीशी घालणार आहे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Edited By : Krupadan Awale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com