esakal | पिंपरीतील रुग्णालयात लसीकरणाचा अभूतपूर्व गोंधळ; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बोलून बातमी शोधा

पिंपरीतील रुग्णालयात लसीकरणाचा अभूतपूर्व गोंधळ; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
पिंपरीतील रुग्णालयात लसीकरणाचा अभूतपूर्व गोंधळ; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : आजपासून शहरात शासनाच्या सूचनेनुसार वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविन पोर्टलवर पूर्व नोंदणी केल्यावर तीन केंद्रावर प्रत्येकी २०० जणांना लस मिळणार होती. महापालिकेच्यावतीने नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, प्रेमलोक पार्क दवाखाना, चिंचवड व भोसरी रुग्णालय येथे ही सुविधा सकाळी अकरा ते चार वेळेत सुरू झाली. अनेक नागरिक सकाळी पाच वाजल्यापासूनच टोकन घेऊन रुग्णालयात हजर होते. पण अकरा वाजता पालिकेच्या लिस्ट मध्ये नाव नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला.

img

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

नागरिकांनी पालिकेच्याविरोधात शेरेबाजी देखील केली. अनेकांनी पालिकेच्या डॉक्टरांशी व अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसला. त्यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांना पाचारण करण्यात आले. त्यांनातरच लसीकरण सुरळीत सुरू झाले.

img