Unseasonal Rain : तळेगाव दाभाडे परिसराला अवकाळी पावसाने झोडपले

जोरदार वादळी वा-यासह गारांचा मारा करत अडीच तास झालेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी (ता. ०२) दुपारी तळेगाव दाभाडे परिसराला झोडपले.
tree collapse in talegaon dabhade by unseasonal rain

tree collapse in talegaon dabhade by unseasonal rain

sakal

Updated on

तळेगाव स्टेशन - जोरदार वादळी वा-यासह गारांचा मारा करत अडीच तास झालेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी (ता. ०२) दुपारी तळेगाव दाभाडे परिसराला झोडपले.

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह दुपारी दोन वाजता अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत काही काळ गारांचा वर्षांव झाल्याने पादचारी आणि व्यवसायिकांची धांदल उडाली. वादळी वा-यामुळे तळेगाव स्टेशन परिसरातील वतननगर,अंबिका पार्क, राजगुरव काॅलनी, यशवंतनगरमधे अनेक ठिकाणी फांद्या आणि झाडे उन्मळून रस्त्यावर पडली.रेल्वे स्टेशन समोरील वीरचक्र चौकात दुचाकीवर बाभळीची झाड कोसळल्याने काही दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com