
राहुल हातोले
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ‘अर्बन स्ट्रीट’सारखी आधुनिक रस्ते आणि पदपथ सुधारणा योजना रखडली आहे. दुसऱ्या बाजूला महापालिकेने पुन्हा टेल्को रस्त्यावर पुन्हा नवीन कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आधीच बेशिस्त असलेली येथील वाहतूक आणखी विस्कळित होण्याची शक्यता आहे.