वापरलेले मास्क थेट रस्त्यावर; पिंपरी-चिंचवडकरांनो, एवढा निष्काळजीपणा बरा नव्हे

वापरलेले मास्क थेट रस्त्यावर; पिंपरी-चिंचवडकरांनो, एवढा निष्काळजीपणा बरा नव्हे
Updated on

पिंपरी : एकीकडे संसर्ग फोफावत असताना दुसरीकडे मास्कबाबत होणारा निष्काळजीपणा समोर आला आहे. पावसात भिजलेले ओले व वापरलेले मास्क, हॅंडग्लोव्हज विल्हेवाट न लावता रस्त्यावर फेकून दिले जात आहे. सर्वाधिक मास्क हे दवाखाना परिसरातच आढळून आले आहेत. परिणामी, अशा हालगर्जीपणातून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस संसर्ग आटोक्‍याच्या बाहेर चालला आहे. महापालिका प्रशासनही या बाबत जनजागृती करत आहे. 'सेल्फी मास्क'चे देखील कॅम्पेन राबविले गेले. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात 500 रुपयांचा दंड ठोठावला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईचाही इशारा दिला आहे. मात्र, रस्त्यावर मास्क टाकणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई अद्याप केली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक बिनधिक्तपणे मास्क डिस्पोजल न करता रस्त्यावर टाकून देत आहेत. काहींच्या मास्कची इलॅस्टिक (दोरी) सैल झाल्यानंतरही तो उघड्यावर टाकून दिला जात आहे. लहान मुले व ज्येष्ठांसाठी हे घातक आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरडा खोकला, शिंका, सर्दी यापासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरणे सर्वांत सुरक्षित आहे. मास्कमुळे विषाणू थुंकीद्वारे पसरत नाही. त्यामुळे दिवसभर वापरलेला मास्क पुन्हा स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तो योग्य पद्धतीने डिस्पोज करणे आवश्‍यक आहे. शहरभर गोरगरिबांना मास्क मोठ्या प्रमाणात वाटले गेले. स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला. मात्र, झोपडपट्टी व दाट लोकवस्तीत याबाबत जनजागृती अत्यल्प आहे. मास्कचे महत्त्व पटवून देण्याबाबत काही संस्थानी पुढाकार घेऊन जनजागृती केली. परंतु, नागरिक गाफील राहिल्याचे दिसून आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भोसरीत साडेपाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क बनवून मास्क मॅनने प्रसिद्धी कमावली. त्याचप्रमाणे मॅचिंग वधू-वरांचे मास्कही बाजारात आले. त्यानंतर महिलादेखील मॅचिंग ड्रेसवर मास्क बनवून वापरू लागले. मास्क आता आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. महागड्या एन-95 किंवा कॉटन मास्कची काळजी नागरिक घेत आहेत. मात्र, स्वस्तात व रस्तोरस्ती दहा किंवा वीस रुपयांत सहजपणे व विनामूल्य उपलब्ध होणाऱ्या मास्कबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे.

...अशी लावा विल्हेवाट

वापरलेला मास्क साबणाच्या पाण्यात किंवा ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात 5 ते 10 मिनिटे निर्जंतुक करा. त्यानंतर कागदात गुंडाळूान तो कचऱ्यामध्ये टाकणे अत्यावश्‍यक आहे. घराजवळ किंवा घरापासून दूर खोल खड्‌ड्‌यात मोकळी जागा असल्यास मास्क कागदात टाकून निर्जंतुक करणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क जाळूनही विल्हेवाट लावता येते. मात्र, वापरलेले मास्क कचऱ्यात किंवा ढिगाऱ्यात गेल्यास त्याची विल्हेवाट लावणे अवघड आहे. मास्क कोरडा वापरावा. ओला मास्क पुन्हा वापरू नये. तो त्वरित बदलावा. कापडी मास्क धुवून पुन्हा वापरता येतो.

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com