Pimpri : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवारी लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
पिंपरी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवारी लसीकरण

पिंपरी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवारी लसीकरण

पिंपरी - शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शनिवार (ता.१३) लसीकरण करण्यात येणार आहे.

नवीन जिजामाता रुग्णालय लसीकरण केंद्रावर कोविड लसीचा पहिला डोस व दुसरा डोसलाभार्थ्यांना सकाळी-दहा ते सायंकाळी पाच यावेळेत करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत रोजगारासाठी परदेशी जात असणाऱ्या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह उपस्थित राहण्यास सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

loading image
go to top