पिंपरी - माझी मुलगी या जगातून गेली आहे. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, अशी भावना वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी माध्यमांशी बोलताना गुरुवारी (ता. २९) व्यक्त केली.
मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे कायदे तज्ञांना शोभत नाही. हगवणे कुटुंबियांनी माझ्या मुलीचा घेतलेला बळी या विषयाला कलाटणी देऊन गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही कस्पटे त्यांनी केला.