
पिंपरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडाळाच्या वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) आगारात नवीन १९ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता हा सर्व परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. स्थानकातील चोरीच्या घटना आणि गैरकृत्य रोखण्यास मदत होणार आहे.