जांबवडे ग्रामपंचायतीचा 
वृक्षसंगोपन स्पर्धेचा स्तुत्य उपक्रम

जांबवडे ग्रामपंचायतीचा वृक्षसंगोपन स्पर्धेचा स्तुत्य उपक्रम

इंदोरी, ता. ८ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तसेच सामाजिक उपक्रम म्हणून गावोगावी उत्साहात वृक्षारोपण करण्यात येते, परंतु; संगोपनाबाबत तेवढी दखल घेतली जात नाही. परिणामी, त्याच खड्ड्यांत दरवर्षी वृक्षारोपण होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. वृक्षारोपण व संगोपन यशस्वी व्हावे म्हणून जांबवडे (मावळ) ग्रामपंचायतीने वृक्ष संगोपन स्पर्धेचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याचे सरपंच तानाजी नाटक व उपसरपंच सागर नाटक यांनी सांगितले.
जांबवडे ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक कुटुंबास पाच झाडांची रोपे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुटुंबाने १५ जूनपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात नावनोंदणी करायची आहे. पसंतीप्रमाणे रोपांचे वाटप केले जाणार आहे. आंबा, पेरू, जांभूळ, चिक्कू, आवळा, चिंच, कवठ, नारळ, सीताफळ इत्यादी फळझाडे तसेच वड, पिंपळ, कडुनिंब (इतर मागणीनुसार देशी झाडे) यापैकी पाच झाडांची रोपे प्रत्येक कुटुंबास सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.
वृक्षारोपण करून प्रत्येक कुटुंबाने काळजीपूर्वक संगोपन करणे बंधनकारक आहे. वृक्षरोपणानंतर एका वर्षाने ग्रामपंचायतीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. त्यावेळी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात येणार आहे. तसेच तीन वर्षांनंतर स्पर्धा परिक्षेच्या द्दष्टीने पाहणी होईल. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम
व सहभागी होणाऱ्या सर्वच कुटुंबांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. प्रथम क्र. ५००० रु., द्वितीय क्र. ३००० रु., तृतीय क्र. २१०० रु. आणि उत्तेजनार्थ ११०० रु. असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरपंच तानाजी नाटक यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com