Viral Video : चलन न फाडता, खिसा गरम करणारी महिला ट्रॅफिक पोलिस झाली कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

वाहतूक पोलिस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली. एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले.

पिंपरी : वाहतूकीचे नियम मोडणे हे काही पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये नवीन नाही. पण, वाहतूकीचे नियम मोडल्यानंतर पावती फाडून केलेल्या चूकीसाठी रीतसर दंड भरण्याऐवजी चिरमिरी देऊन प्रकरण मिटविण्याचे प्रकार आपण ऐकत असतो. पण असाच काहीसा प्रकार व्हिडओत कैद झाला आहे.

पिंपरीतील वाहतूक पोलिस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी लाच घेण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली.पिंपरी बाजारपेठेतील रस्त्यावर एक तरुणी या महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या खिशात पैसे ठेवतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला.  पिंपरीच्या शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे.

वाहतूक पोलिस कर्मचारी महिलेने कारवाई टाळण्यासाठी एका तरुणीकडून लाच स्वीकारली. एवढेच नव्हे तर लाचेचे पैसे पॅन्टच्या पाठीमागच्या खिशात ठेवण्यास तरुणीला सांगितले. दरम्यान, हा सर्व प्रकार रस्त्याकडेला असलेल्या इमारतीमधील मुलांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला. हा व्हिडिओ शहरात जोरदार व्हायरल झाला.

पिंपरीच्या शगुन चौकातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video of female traffic police taking bribe goes viral in Pimpri pune