गावजत्रांचा हंगाम यंदाही ‘फेल’

Jatra
Jatra

वडगाव मावळ - मावळात गावजत्रांचा हंगाम सुरू असून, चैत्र महिन्यात अनेक गावांत ग्रामदैवतांच्या जत्रा आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी जत्रांवर सावट आहे. त्यामुळे जत्रांमध्ये गावोगावी होणाऱ्या आर्थिक उलाढालीच्या अर्थकारणाला यंदाही फटका बसणार आहे. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांप्रमाणेच विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मावळातील सद्यःस्थिती

  • मावळात दत्तजयंती ते अक्षयतृतीया या कालावधीत गावोगावी ग्रामदैवतांच्या जत्रा
  • गेल्या वर्षी जत्रांच्या काळात कोरोनाचे वातावरण राहिल्याने सर्व गावांच्या जत्रा साध्या पद्धतीने साजऱ्या झाल्या
  • कोरोनाचा विळखा सैल झाल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत
  • मंदिरे खुली झाल्यानंतर धार्मिक विधींना पुन्हा सुरवात
  • गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने निर्बंध लागू
  • यंदाही यात्रा, जत्रा, उरुस यावर बंदीचे आदेश

आर्थिक उलाढाल

  • छोटे-मोठे व्यावसायिक मनोरंजनाच्या साहित्यासह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात
  • बाळगोपाळांसह महिला मंडळी गावजत्रेत खरेदीचा घेतात मनमुराद आनंद
  • चक्री, पाळणे आदींमध्ये बसण्याचाही लुटतात आनंद
  • गावजत्रांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल
  • तमाशा, नाटक, भारुड, ढोल-लेझीम पथके आदी कलाकारांसाठी व्यवसायाची ही मोठी पर्वणी
  • गावजत्रांमधून मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून वर्षभरातील खुराकाचा खर्च निघतो

यंदा अशा होणार यात्रा

  • गेल्या वर्षी व्यावसायिकांसह कलाकारांना कोरोनाचा मोठा आर्थिक फटका
  • यंदाही गावजत्रांवर कोरोनाचे व निर्बंधाचे सावट असल्याने त्या साध्या पद्धतीने साजऱ्या होण्याची शक्‍यता
  • मनोरंजनाच्या व गर्दीचे कार्यक्रम टाळून फक्त धार्मिक विधींचाच जत्रेत समावेश असण्याची शक्‍यता
  • गावजत्रांमध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होणार आहे. 

तालुक्यातील प्रमुख यात्रा-जत्रा

  • गुढीपाडवा - तळेगाव दाभाडे-श्री डोळसनाथ महाराज उत्सव
  • गुढी पाडवा ते चैत्रपौर्णिमा - वेहेरगाव-श्री एकवीरा देवी उत्सव
  • रामनवमी - नवलाख उंब्रे-श्री रामजन्मोत्सव सोहळा
  • चैत्रपौर्णिमा (हनुमान जयंती)-वडगाव मावळ, तळेगाव स्टेशन, कान्हे, साते, जांभूळ- श्री भैरवनाथ महाराज उत्सव
  • चैत्र महिन्यात पवन मावळातील बहुतांशी गावांतील ग्रामदैवतांच्या जत्रा

असा असतो गावजत्रांचा हंगाम

  • मावळ तालुक्‍यात सध्या गाव जत्रांचा हंगाम सुरू
  • चैत्र महिन्यात वडगाव, तळेगाव, कान्हे, साते, जांभूळ, कामशेत सह अनेक गावांमध्ये गावजत्रा
  • बहुतेक गावांचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज असल्याने चैत्र महिन्यात सर्वाधिक गावांच्या जत्रा
  • कार्ला येथील श्री एकवीरा देवीची वार्षिक यात्राही याच महिन्यात
  • कामधंदा, व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास गेलेली मंडळी, पाहुणे-रावळे, मित्र परिवार गावजत्रेला आवर्जून उपस्थिती
  • पारंपरिकतेनुसार बैलगाडा शर्यत, तमाशा व कुस्तीचा आखाडा ही गावजत्रेची प्रमुख वैशिष्ट्ये
  • गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतींवर बंदी असल्याने गावजत्रांमधून ही शर्यत हद्दपार
  • अनेक गावात जत्रेनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन
  • यात्रेत पहिल्या दिवशी अभिषेक, महापूजा, पालखी मिरवणूक, भजन, मानाचे बगाड, भजनी भारुड, तमाशा
  • दुसऱ्या दिवशी सकाळी भारुड अथवा तमाशाची हजेरी व संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा
  • दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कुस्त्यांच्या आखाड्यात तालुक्‍यातील नामवंत पैलवान मंडळी आवर्जून हजेरी
  • जत्रेच्या पहिल्या दिवशी गोड-धोड तर दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवणाचा घाट घालून पाहुण्या रावळ्यांबरोबरच मित्र परिवारालाही निमंत्रण
  • मावळच्या ग्रामीण भागात वर्षभरातील अनेक सणांपैकी गावची जत्रा (उरुस) हा एक महत्त्वाचा सणच
  • जत्रेनिमित्त पाहुणे मंडळी येत असल्याने अनेक विवाह सोहळेही या निमित्ताने ठरतात

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपूर्ण मावळ तालुक्‍याचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री पोटोबा महाराजांचा चैत्रपौर्णिमेचा उत्सव गेल्या वर्षी कोरोनामुळे झाला नव्हता. यंदाही कोरोनाचे सावट कायम असल्याने सरकारच्या आदेशानुसार साध्या पद्धतीनेच गावजत्रा भरवली जाईल. परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी होतील. मनोरंजनाच्या व गर्दीच्या कार्यक्रमांना मात्र फाटा दिला जाईल. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करू.
- सोपानराव म्हाळसकर, मुख्य विश्‍वस्त, श्री पोटोबा देवस्थान, वडगाव मावळ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावोगावच्या यात्राजत्रा पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस सरकारने दिलेल्या या आदेशाची गावोगावी अंमलबजावणी करतील. गावोगावच्या उत्सव समित्यांना शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येईल.
- सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, वडगाव मावळ पोलिस ठाणे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com