Gahunje News : आमचा विकास झालाय! आता भूमिहीन करता का? - गहुंजेतील ग्रामस्थांचा महापालिकेत समावेशास विरोध

विकास आराखड्यामधून आरक्षणे टाकून आम्हा शेतकऱ्यांना भूमिहीन करायचे आहे का, असा सवाल गहुंजेतील ग्रामस्थांनी केला आहे. आमचा पालिकेत समावेश करण्यास विरोध होता, आहे आणि भविष्यातही असेल.
pcmc
pcmcsakal

शिरगाव - आमच्या गावाचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर जो विकास होणार आहे, तो आम्ही आधीच केला आहे. विकास आराखड्यामधून आरक्षणे टाकून आम्हा शेतकऱ्यांना भूमिहीन करायचे आहे का, असा सवाल गहुंजेतील ग्रामस्थांनी केला आहे. आमचा पालिकेत समावेश करण्यास विरोध होता, आहे आणि भविष्यातही असेल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

गावाचे सरपंच कुलदीप बोडके आणि इतर ग्रामस्थ म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाला तरच विकास होतो असे काही आहे का? आमचा तसाही सर्व विकास झालाच आहे. याशिवाय काही विकासाची कामे सुरु आहेत. तेही येत्या काही दिवसांत पूर्ण होतील.

सध्या गावात अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, स्मशानभूमी, शाळांच्या इमारती, अंतर्गत गटार योजना, जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. ती लवकरच पूर्णत्वास येईल. त्यामुळे, आम्हाला समाविष्ट करण्याचा कोणताही मानस महापालिकेने ठेवू नये. गहुंजे हे गाव लहान असल्याने गावाला जमीन कमी प्रमाणात आहे आणि गावात एमसीएचे भव्य स्टेडियम आणि खासगी निवासी भव्य गृहनिर्माण प्रकल्प आणि शैक्षणिक संकुल आहेत.

या प्रकल्पांना आमची जमीन गेली. त्यात पुन्हा महानगरपालिका म्हणजे अजून विकास कामांना जमीन जाईल. म्हणजे शेतकरी भूमिहीन करायचा आहे का ? असा सवाल बोडके यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केला. गहुंजे ग्रामपंचायतीने ५ वर्षांपूर्वीही समावेशास विरोध केला होता. तसा ठरावही केला होता आणि आताही आम्ही त्यावर ठाम आहोत, असेही बोडके यांनी सांगितले.

ग्रामस्थ म्हणतात...

  • पवना नदीमुळे शेती चांगल्या प्रकारे पिकते.

  • गावचा शेतीप्रधान गाव म्हणून लौकिक

  • गावाला जमीन कमी. आणखी गेल्यास मग आम्ही काय करावं?

  • गावातील फुलशेती जिल्हाभरात प्रसिद्ध आहे.

  • महापालिकेपेक्षा गावात शैक्षणिक सुविधा चांगल्या.

महानगरपालिकेत समावेश झाल्यावर जी विकासकामे होणार आहेत, बहुतेक ती सर्व आम्ही केली आहेत. गावात अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, सार्वत्रिक ठिकाणी वीजपुरवठा, बंदिस्त गटार योजना, अशी मूलभूत बहुतेक कामे झाली आहेत. आणखी कामे सुरू आहेत. तीही लवकर पूर्ण होतील.

- कुलदीप बोडके, सरपंच, गहुंजे ग्रामपंचायत

माझ्या कार्यकाळात आम्ही विरोध असल्याचा ठराव दिला होता. पालिकेतील समावेशाला तेव्हाही विरोध होता. आताही आहे आणि उद्याही राहील. गावाला आधीच कमी जमीन आहे. गावात कमी प्रमाणात असणाऱ्या जमिनी आणखी कमी होतील. ते आम्हाला नको आहे.

- वनिता आगळे, माजी सरपंच, गहुंजे ग्रामपंचायत

गावात सरकारी जागेत झालेली अतिक्रमणे, अंतर्गत वादामुळे रखडलेले अरुंद रस्ते, वाड्या वस्त्यावर न पोहोचलेले पाणी, अगदी लहान जागेत केलेले मोठे बांधकाम अशी परिस्थिती आहे. गावाचा सर्वांगीण विकास होणार नसेल तर महापालिकेत समाविष्ट होणे योग्य ठरेल. ही सर्व कामे कायदेशीरपणे करेल.

- यशवंत बोडके, माजी सरपंच, गहुंजे ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com