देहूमध्ये कडक नियमांना तिलांजली!

Violation Of strict Regulations in Pune Dehu Road
Violation Of strict Regulations in Pune Dehu Road

देहू : देहूरोड कॅटोन्मेंट बोर्ड प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या समन्वया अभावी देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत नागरिकांकडून राजरोसपणे कोरोनाच्या नियमांना तिलांजली देण्यात येत असल्याचे शनिवारी (ता.3) बाजारपेठेत चित्र होते. त्यामुळे देहूरोड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात शनिवार (ता.3) पासून कडक नियम लागू करण्यात आले. मात्र देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत या नियमांना नागरिकांकडून तिलांजली देण्यात येत आहे.

देहूरोड बाजारपेठेतील रस्त्यावर सर्रास नागरिक हातगाडीवरील अन्न पदार्थावर ताव मारत असल्याचे शनिवारी सकाळी चित्र होते.तर शहरातील अनेक हॅाटेलमध्ये ग्राहकांची गर्दी होती. तर पुणे मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाखाली नागरिक एकत्र येवून गप्पा मारत होते. याबाबत देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी सांगितले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

''जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम लागू केले आहेत. तेच नियम देहूरोडकरांसाठीही आहेत. जनतेने नियम पाळावेत. तसेच रस्त्यावरील नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी. तरी मी कॅटोन्मेंट बोर्डाच्या स्टाफ पाठवून माहिती घेतो'' देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विलास सोंडे यांनी सांगितले.

''पोलिस यंत्रणा कारवाई करत आहे. रस्त्यावरील हातगाडीवाले पथारीवाल्यांची लिस्ट आम्हांला बोर्डाने दिलेली नाही. बोर्डानेही आमच्याबरोबर एकत्र येवून कारवाई केली पाहिजे. उद्या आम्ही एखाद्या हातगाडीवाल्यावर कारवाई करणार तर तोच आमच्या पोलिसांबद्दल वरिष्ठाकडे तक्रार करणार.सध्या आमच्या पोलिसांच्या संदर्भात तीन ते चार तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.तरी शहरात नियम पाळले जावोत. यासाठी मी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बोलणार आहे.

इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत - मनसे

शुक्रवारी(ता.2) आढळले रुग्ण संख्या- 19
आतापर्यत एकूण रुग्ण संख्या- 1648
सध्या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण- 10
होम आयसोलेशन रुग्ण संख्या- 92.
एम.बी.कॅम्प महात्मा गांधी शाळेतील सेंटरमधील रुग्ण संख्या-55.
हिंजवडी येथे सेंटरमध्ये दाखल-01
एकूण अॅक्टीव्ह रुग्ण---158
आजपर्यत बरे होवून घरी सोडलेले रुग्ण संख्या --1454
आजअखेर एकूण मृत्यू--36


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com