esakal | पिंपरी चिंचवड मधील मतदार छायाचित्रांबाबत उदासीन
sakal

बोलून बातमी शोधा

Voter List

पिंपरी चिंचवड मधील मतदार छायाचित्रांबाबत उदासीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी/आकुर्डी - निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार शहरातीन मतदार याद्यांमध्ये (Voter List) मतदारांचे छायाचित्र (Photograph) आवश्‍यक आहे. त्यासाठी पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांची पुनर्रिक्षण मोहीम राबविण्यात आली. त्याची मुदत दोन दिवसांपूर्वी संपली. या मोहिमेला अल्पप्रतिसाद मिळाला असून, मतदारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. कारण, बहुतांश मतदारांनी आपली छायाचित्रे निवडणूक विभागाकडे दिलेली नाहीत. (Voters in Pimpri Chinchwad Indifferent to Photographs)

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या नोव्हेंबरपासून मतदार छायाचित्र नसलेल्या मतदार याद्यांचे अद्ययावरीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम राबवण्यात आला. त्यासाठी विशेष शिबिरे घेतली. छायाचित्र देण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

हेही वाचा: स्मार्ट सिटी की, गुंडांची सिटी

छायाचित्र कशासाठी?

संविधानानुसार प्रत्येक नागरिकाने एका निवडणुकीसाठी एकदाच मतदान करायला हवे. मात्र, काही जणांचे एकापेक्षा अधिक ठिकाणच्या मतदार यादीत नाव असते. शिवाय, मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार यादीत छायाचित्र आवश्‍यक आहे. यामुळे बोगस मतदानाला आळा बसू शकतो.

मतदार यादी कुठे?

महापालिकेच्या pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या उपलब्ध आहे. सर्वांना त्या पाहता येऊ शकतात. डाऊनलोड करता येतात. त्यामुळे त्यात छायाचित्र आहे किंवा नाही, याची माहिती मिळू शकते.

छायाचित्रासाठी काय?

महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज क्रमांक-८ भरावा. नॅशनल व्होटर सर्विस पोर्टल (एनव्हीएसपी) संकेतस्थळ किंवा व्होटर हेल्पलाइनवर छायाचित्र अपलोड करावे. किंवा विधानसभा मतदारसंघ निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन छायाचित्र द्यावे. त्यासोबत रहिवासी पुरावा द्यावा.

हेही वाचा: हिंजवडी नागरी विकास केंद्रात सात गावांचा समावेश करावा; पीएमआरडीएचा प्रस्ताव

ऑनलाइन अर्जासाठी

एनव्हीएसपी संकेतस्थळावर e-Epic डाऊनलोड करा. E-Roll मध्ये तुमचे नाव शोधा. अर्जाच्या पर्यायामध्ये जा. पत्ता बदलला असल्यास ८-ए अर्ज भरा. तसेच, छायाचित्र, नाव व पत्त्यात दुरुस्ती करता येईल. मात्र, त्यापूर्वी अर्ज रजिस्टर झाल्यानंतर ॲप्लिकेशन आयडी’चा मेसेज मोबाईलवर येईल. ‘ॲप्लिकेशन आयडी’ ट्रॅक केल्यावर अर्जाबाबत माहिती मिळेल.

काय पुरावे हवेत?

मतदार यादीत छायाचित्र देण्यासाठीच्या अर्जासोबत ओळखीचा पुरावा द्यावा लागतो. त्यात वीज बिल, गॅसबुक, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबुक, आधारकार्ड अशी कागदपत्रे हवीत. त्यासोबत दोन छायाचित्रे द्यायची आहेत.

दृष्टिक्षेपात मतदार

विधानसभा एकूण मतदार छायाचित्र नसलेले

पिंपरी ३,५३,२२५ १२,५००

चिंचवड ५,२८,८१६ ७,६९६

भोसरी ४,६६,२५७ ३,१६८

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र देण्याची मोहीम सुरू आहे. आपले छायाचित्र मतदार यादीत यावे, यासाठी नागरिकांनी छायाचित्र द्यायला हवे.

- सुनील अलमलेकर, उपायुक्त, महापालिका

loading image