कामशेतला जोडणारा वडिवळेचा पूल पाण्याखाली; नऊ गावांचा संपर्क तुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vadivale Bridge

नाणे मावळातील दुर्गम भागात समावेश असणाऱ्या गावांचा कामशेत शहराशी जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे.

कामशेतला जोडणारा वडिवळेचा पूल पाण्याखाली; नऊ गावांचा संपर्क तुटला

कामशेत - नाणे मावळातील दुर्गम भागात समावेश असणाऱ्या वडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, खांडशी, नेसावे, वेल्हवळी, मुंढावरे व उंबरवाडी या गावांना कामशेत शहराशी जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. या भागाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असतो. मावळातील हा भाग पश्चिम भागात असल्याने या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडतो. याशिवाय लोणावळा भागातील पावसाचे पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रातून या भागातच येत असते.

परिणामी वडिवळे गावातील हा पूल दरवर्षी दहा-बारा दिवस पाण्याखालीच असतो. अतिवृष्टीच्या काळात या गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असते. विद्यार्थ्यांची शाळा बुडते. तसेच कामगार, दूध व्यावसायिक यांना आपल्या कामावर पाणी सोडावे लागते.पावसाळ्यात पुलामुळे नागरिकांच्या जीवनातील दरवर्षी दहा-बारा दिवस वाया जातात, अशा प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिक करत आहेत.

अरुंद पुलामुळे अडचण

हा पूल खूपच अरुंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ‘नेत्यांच्या आश्वासनांनी भिजलेला पूल, याही वर्षी पाण्याखाली गेला,’ अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या होत्या.

Web Title: Wadivale Bridge Connecting Kamshet Under Water Nine Villages Were Cut Off Contact

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..