पिंपळे गुरव - फुगेवाडी परिसरावर गेल्या दोन दिवसांपासून जणू मृत्यूचे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या सलग घटनांनी अवघ्या काही तासांत आठ जणांनी जीव गमावले असून, परिसर शोकसागरात बुडाला आहे. .फुगेवाडी परिसरातील आनंदवन, काटे वस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या भागांतील घरांतून आक्रोश आणि हंबरडे ऐकू येत आहेत. कालपर्यंत हसणाऱ्या, वावरणाऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्याचा जबर धक्का येथील नागरिकांना बसला आहे. या घटनांनी अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यातील विजय राठोड (वय ३१) आणि राजेंद्र राठोड (वय ३४) या भावांना काळाने एकाच वेळी कवेत घेतल्याने राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या दोन तरुण मुलांना गमावण्याचे त्यांच्या आईचे दु:ख शब्दांत मांडणे कठीण आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असला, तरी फुगेवाडीतील प्रत्येक गल्लीमध्ये आक्रोश आणि दुःख हे शहराला अस्वस्थ करणारे आहे. कालपर्यंत गजबजलेले हे गाव मृत्यूच्या सावटाखाली होते..उपासमारीची वेळ येण्याची भीतीसुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बाबा शेख (वय ४४) यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, इलेक्ट्रिशियन असणारे अकबर पठाण (वय ५२) यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा पोरका झाला आहे. राजेंद्र राजपूत (वय ५१), पांडुरंग फुगे (वय ५७) आणि आनंद देसाई (वय ६०) यांच्या निधनानेही त्यांचे नातेवाईक शोकसागरात बुडाले आहेत..‘ईद मुबारक’ऐवजी आक्रोशयंदाची बकरी ईद फुगेवाडीतील मोहल्ल्यासाठी आनंदाची नव्हे, तर आयुष्यभर न विसरता येणारी वेदना घेऊन आली. ज्या दिवशी घरोघरी ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांनी वातावरण भारावून जाणार होते, त्याच दिवशी अकबर पठाण आणि बाबा शेख यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली. एकाने आपल्या हातांनी घरे उजळवली तर; दुसऱ्याने कष्टाने संसार उभा केला. पण, नियतीने दोघांनाही एकाच दिवशी हिरावून नेले. गळाभेट घेण्याचा दिवस असताना, त्याच दिवशी त्यांच्या घरातून निघालेल्या अंत्ययात्रांनी प्रत्येकाचे मन हेलावले. ईदचा आनंद हरवून, त्या जागी फक्त अश्रू आणि आठवणी उरल्या आणि संपूर्ण परिसर नि:शब्द झाला..अक्षयची प्रकृती चिंताजनकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘फुगेवाडी परिसरातील अक्षय अवसरमल (वय २०) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.पोलिस प्रशासनाच्या भूमिकेमुळे रोषफुगेवाडी परिसरात नागरिकांची प्रकृती अचानक बिघडण्यास मंगळवारी रात्रीपासून सुरुवात झाली. या घटनेमागचे कारण समोर आले नसले, तरी ही विषबाधा आहे का किंवा अन्य काही भीषण कारण आहे याबाबत कोणतीही ठोस माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आलेली नाही. या घटनांच्या तपासाबाबत पोलिसांनी तातडीने हालचाल केली नसल्याचा आरोप काही स्थानिक नागरिकांनी केला आहे..‘आमचे पप्पा कधी येणार?’मुंबई सोडून फुगेवाडीत कष्टाने संसार उभारणारे राठोड बंधू काळाच्या पडद्याआड गेले. या घटनेने सुन्न झालेल्या सोनाली आणि संगीता राठोड या दोन्ही जावांनी हंबरडा फोडला. या भावंडांना प्रत्येकी दोन अपत्ये आहेत. त्यामुळे ही चिमुरडी पोरकी झाली आहेत. ‘आमचे पप्पा कधी येणार?’ या त्यांच्या प्रश्नाने वातावरण सुन्न झाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.