Wakad Crime : सासूकडून दहा लाख मिळविण्यासाठी बापानेच केले मुलगी व पुतणीचे अपहरण

सासूच्या बँक खात्यावरील दहा लाख रुपये मिळविण्यासाठी बापाने मुलीच्या व पुतणीच्या अपहरणाचा केला बनाव.
Wakad Police Station
Wakad Police Stationsakal

वाकड - सासूच्या बँक खात्यावरील दहा लाख रुपये मिळविण्यासाठी बापाने मुलीच्या व पुतणीच्या अपहरणाचा बनाव केला. त्यानंतर खंडणीचा बनावट फोन करून खंडणीची मागणी केली मात्र, वाकड पोलिसांनी हा बनाव उधळून लावत मुलींची सुटका करत बापाला बेड्या ठोकल्या.

सचिन मोहिते (वय ४२, रा. वाघोली) असे अटक केलेल्या आरोपी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी सारिका कैलास ढसाळ (वय ३८, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री अडीचच्या सुमारास उपनिरीक्षक रोहित दिवटे कर्मचाऱ्यांसह गस्त घालताना कोकणे चौकात काहीजण पळापळ करत असल्याचे त्यांना दिसले.

त्यांना विचारणा केली असता सारिका ढसाळ यांनी सांगितले की, सायंकाळी राखी खरेदी करायला गेलेली त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची बहिण शितल सचिन मोहीते यांची पंधरा वर्षांची मुलगी या दोघी बेपत्ता आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके तयार करून मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली असता अपहृत पंधरा वर्षीय मुलीचे वडील सचिन मोहिते देखील हजर होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचे सचिन याने जबाबात सांगितले. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता घटना घडतेवेळी सचिन हा मोटार सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेल्याचे वाघोलीतील शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.

त्यामुळे पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता सचिनच्या मोटारीप्रमाणे दिसणाऱ्या मोटारीत बसून दोन्ही मुली गेल्याचे दिसले. बुधवारी सकाळी पुन्हा पोलीस फिर्यादी यांच्या घरी गेले असता सचिन याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, बहिण सारिका यांचा तीन महिन्यांपूर्वी मोबाईल हरवला होता.

त्या नंबरवरून अपहरणकर्त्यांचा फोन आला होता. तुमच्या मुली सुखरूप पाहीजे असतील तर पोलीसांना काही न सांगता दहा लाख रुपये दया. नाहीतर तुमच्या मुलीचे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिल्याचे सांगितले.

त्या फोनवर सचिन मोहिते याचे बोलणे झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सचिन मोहिते याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे सिद्ध केले. त्यानुसार पोलिसांनी सचिनकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

सासू पुष्पा अल्हाट यांना भीती दाखवून त्यांच्या बँकेत असणाऱ्या जंगम मालमत्तेपैकी दहा लाख रुपये मिळवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव केल्याचे त्याने सांगितले मुलींना पुणे मनपा येथून पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले.

आरोपीने दोन्ही मुलींना वाघोली येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले असून त्या सकाळी दहा वाजता वाघोली येथून निघून मनपा पुणे येथे येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मनपा पुणे येथे तीन पथके पाठवली. मात्र प्रवासाला लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळ झाला तरीही मुली तेथे न पोहोचल्याने पोलिसांची धाकधूक वाढली.

सचिन याने मुलींना ठेवलेल्या जागी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. मात्र तिथेही मुली नव्हत्या त्यामुळे पोलिसांनी पीएमपीएल प्रशासनाशी समन्वय साधत वाघोली ते पुणे मनपा दरम्यानच्या बस चालक व वाहकांना संपर्क करत मुलींची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास मुलींना बसमधून ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कामगिरी

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, रोहीत दिवटे, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अतिश जाधव, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, भास्कर भारती, अजय फल्ले, रमेश खेडकर, कौंतेय खराडे, सागर पंडीत यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com