Mobile Recovery : वाकड पोलिसांनी हरवलेले व चोरीचे १३७ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले असून, या कारवाईत सीईआयआर पोर्टलचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून मोबाईल हस्तगत करण्यात आले.
पिंपरी : हरवलेल्या व चोरी झालेल्या १३७ मोबाईलचा वाकड पोलिसांनी शोध घेतला. ते मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. पोलिसांनी हे मोबाईल महाराष्ट्रासह परराज्यातून हस्तगत केले.