esakal | गुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले.पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य मिळाले.

गुन्हेगारी टोळी वाकडमध्ये जेरबंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई डांगे चौकाजवळ करण्यात आली. तुषार आनंद भरोसे (वय २२, रा. पुणे), सिद्धार्थ अनंत भगत (वय २१, रा. पुणे), प्रेमशीतल जानराव (वय १९, रा. पुणे), स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय २२, रा. रहाटणी), श्रीपाद ऊर्फ ओंक्‍या मारुती कामत (वय १८, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. रविवारी (ता.२४) दुपारी साडेतीनच्या सुमारास काहीजण डांगे चौकातील शेल पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य मिळाले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली पोलिसांना दिली. 

दुचाकीचालकाला मारहाण
दुचाकीचालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी रिक्षाचालकासह त्यातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आलिम बादशाह शेख (रा. तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे वीस जानेवारीला तळवडे- त्रिवेणीनगर रस्त्याने दुचाकीवरून जात असताना एका अनोळखी रिक्षाचालकाने फिर्यादीला दुचाकीला बाजूला घेण्यास सांगितले. रिक्षातील व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्‍यात टपली मारली. यावरून फिर्यादी त्याला ओरडले असता रिक्षातील मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीला शिवीगाळ करीत वीट डोक्‍यात मारली. तर रिक्षाचालकाने शिवीगाळ केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोबाईलवर मटका जुगार 
मोबाईलवरून मटका जुगार घेणाऱ्या दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. दत्ता शिवलिंग कानडे (रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी), राकेश कदम (रा. काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी दहा टक्के कमिशनवर लोकांकडून मोबाईलवर व्हॉट्सॲपवरून मटका जुगार घेत होते. 

मारहाणप्रकरणी  दोघांवर गुन्हा दाखल 
मोटारीला दुचाकी आडवी लावून मोटारचालकाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय परदेशी (वय २३), बॉक्‍सर ऊर्फ कृष्णा पारधे (वय २४, दोघेही रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. राहुल अर्जुनदास मेलवानी (रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मोटारीतून जात असताना आरोपी वाकडी तिकडी दुचाकी चालवीत आले. फिर्यादी मोटार हळू चालवीत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत त्यांची दुचाकी मोटारीसमोर आडवी लावली. त्यानंतर त्यांना हाताने मारहाण करीत डोक्‍यात वीट मारली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा