

Wakad Traffic Jam
esakal
वाकड : काळाखडक चौकासह रस्त्यांवर आणि पदपथांवर सर्रास बेकायदा पार्किंग होत असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. बेकायदा उभ्या वाहनांवर टोईंगची कारवाई सुरू केली असून यापुढे नियमित कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.