Pimpri Chinchwad Crime : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा गुंडांवर कारवाईचा धडाका; तीन टोळ्यांवर ‘मोका’

आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
Crime
Crimesakal

पिंपरी - आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पिंपरी, वाकड, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई तसेच वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ गुन्हेगारांवर तडीपार कारवाई तर वाकड, दिघी आणि पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, यापुढेही ही कारवाई सुरु राहणार आहे.

पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूरज उत्तम किरवले (वय २४, रा. स्पाईन रोड, घरकूल, चिखली), यश ऊर्फ पाशा कैलास भोसले (वय २१, रा. रिव्हर रोड, पिंपरी), अविनाश प्रकाश माने (वय २२, रा. बौद्धनगर, पिंपरी), गणेश जमदाडे (रा. भाटनगर, पिंपरी) यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, शस्त्र बाळगणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

वाकड ठाण्याच्या हद्दीतील रोहित मोहन खताळ (वय २१, रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव), साहिल हनिफ पटेल (वय २१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), ऋषीकेश हरी आटोळे (वय २१, रा. बेलठीकानगर, शिवदर्शन कॉलनी, थेरगाव), शुभम चंद्रकांत पांचाळ (वय २३, रा. अष्टविनायक कॉलनी, काळेवाडी), अनिकेत अनिल पवार (वय २७, रा. पवारनगर, थेरगाव), प्रीतम सुनील भोसले (वय २०, रा. आदर्शनगर, काळेवाडी), शिवशंकर श्यामराव जिरगे (वय २२, रा. दत्तनगर, थेरगाव), सुमीत सिद्राम माने (वय २३, रा. शिवराजनगर, रहाटणी), गणेश बबन खारे (वय २६, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), अजय भीम दुधभाते (वय २२, रा. पडवळनगर, थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (वय २१, रा. पवारनगर, थेरगाव), कैवल्य दिनेश जाधवर (वय १९, रा. उंड्री, हडपसर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, असे १९ गुन्हे दाखल आहेत.

निगडी ठाण्याच्या हद्दीतील अमन शंकर पुजारी (वय २२), शिवम सुनील दुबे (वय २१), रत्ना मिठाईलाल बरुड (वय ३६, तिघेही रा. पांढारकर वस्ती चौक, पंचतारानगर, आकुर्डी) यांच्यावर कट रचून खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे असे सहा गुन्हे दाखल आहेत.

जिल्ह्यातून १७ गुन्हेगार तडीपार

पोलिस ठाणे, गुन्हेगाराचे नाव, पत्ता व तडीपारीचा कालावधी पुढीलप्रमाणे -

वाकड - आनंद किशोर वाल्मीकी (वय २९, रा. काळाखडक, वाकड, दोन वर्ष), आशिष एकनाथ शेटे (वय २४, रा. नखातेवस्ती, रहाटणी, एक वर्ष), म्हाळुंगे - संकेत माणिक कोळेकर (वय २२, रा. धामणे, ता. खेड, एक वर्ष), चिखली-आकाश बाबू नडविन मणी (वय २१, रा. मोरेवस्ती, चिखली, दोन वर्ष), देहूरोड - रोहित ऊर्फ गबऱ्या राजस्वामी (वय २२, रा. एमबी कॅम्प देहूरोड, एक वर्ष), ऋषिकेश ऊर्फ शऱ्या अडागळे (वय २४, रा गांधीनगर देहूरोड, दोन वर्ष), पिंपरी- सूरज रामहरक जैस्वाल (वय २१, दोन वर्ष), शुभम राजू वाघमारे (वय २२, दोघेही रा. नेहरूनगर, पिंपरी, दोन वर्ष), वृषभ नंदू जाधव (वय २१, दोन वर्ष), शेखर ऊर्फ बका बाबू बोटे (वय २०, दोन वर्ष), शुभम अशोक चांदणे (वय १९, दोन वर्ष), शांताराम मारुती विटकर (वय ३४, दोन वर्ष), अनुराग दत्ता दांगडे (वय १९, पाचही रा. इंदिरानगर चिंचवड, दोन वर्ष), सागर ज्ञानदेव ढावरे (वय २०, रा. मिलिंदनगर पिंपरी, दोन वर्ष), पंकज दिलीप पवार (वय ३२, रा. चिंचवड, दोन वर्ष), सोन्या ऊर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे (वय २१, रा. दत्तनगर चिंचवड, दोन वर्ष), आनंद नामदेव दणाणे (वय ३१, रा. विद्यानगर, चिंचवड, दोन वर्ष)

तीन गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध

संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे (रा. अमरदिप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर १४ गुन्हे दाखल असून, अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे (रा. भारतमातानगर, दिघी) याच्यावर तीन तर दीपक सुरेश मोहिते (रा. विजयप्रभा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी) याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com