

पिंपरी : आयटीमध्ये नोकरी करणाऱ्या एका आयटीयन्सने त्याची सात वर्षाची आठवणीतली वारी चित्रांच्या माध्यमातून रेखाटली आहे. त्याच्या या इलस्ट्रेशन चित्रांचा डिजिटल अल्बम तयार करून तो फेसबुक दिंडी व सोशल मीडियावर सर्वांच्या आवडीचा विषय ठरला आहे. या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीला जाता न आल्याने त्याने 'याची देही याची डोळा' याची प्रचिती चित्रांच्या माध्यमातून करून वारीला पूर्णत्व प्राप्त करून दिले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भोसरी, इंद्रायणीनगर येथे राहणाऱ्या अजय शिंदे या 34 वर्षाच्या तरुणाने वारी दरम्यान वारकऱ्यांच्या व माऊलीच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या. दरवर्षी रथाच्या मागे पवन मावळ येथे असलेल्या दिंडी क्रमांक 31 मध्ये तो सहभागी असत. मात्र, यावर्षी कोरोनाने कहर केल्यामुळे वारीला विश्रांती मिळाली.
अवघ्या काही वर्षांत जीवनाचा सार समजलेल्या या अवलियाने वारकरी संप्रदायाच्या वारीतील छटा, फुगड्यांचा आनंद, अंघोळी दरम्यान वारकऱ्यांची उडालेली झुंबड, वारकऱ्यांच्या खांद्यावर बसलेली वारीत सहभागी झालेली चिमुकली, महिला भाविकांची दैनंदिन कामे व त्यांच्या रंगलेल्या गप्पा, विसाव्या दरम्यान भाविकांचे नामस्मरण त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी मनोभावे केलेली वारकऱ्यांची सेवा अशा प्रकारचे जिवंत चित्रण त्यांनी रेखाटले आहे.
अजय म्हणाला, 'पूर्वीपासून मला फोटोग्राफीचा छंद आहे. लॉकडाउनमध्ये 42 दिवसांत मी ही चित्रे रेखाटली आहेत. दिवेघाटातून पुढे गेल्यानंतर खरी वारी मी अनुभवली आहे. यावर्षी माझ्या सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनाला मुकलो असलो तरी माझ्या कलेतून वारी साकारली व त्याला जिवंतपणा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी मी सुट्ट्यांची बचत करून खास वारीसाठी एक ते दीड महिन्यांची सुट्टी काढतो व वारीत सहभागी होतो. तरुणांनी एकदा तरी आयुष्यात येऊन वारीचा आनंद घ्यावा. वारी ही जाती-भेदाला छेद देणारी आहे. आयुष्यात वारी म्हणजे आनंदाचा परमोच्च क्षण आहे.'
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.