esakal | पिंपरी : नगरसेविकेचे संभाषण व्हायरल करणाऱ्या अभियंत्याला ताकीद
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी : नगरसेविकेचे संभाषण व्हायरल करणाऱ्या अभियंत्याला ताकीद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - प्रभागातील कामांसंदर्भात नगरसेविकासोबत मोबाईलवर झालेले संभाषण महापालिकेच्या उपअभियंत्याने व्हायरल केले होते. या बाबत सर्वसाधारण सभेत प्रश्‍न उपस्थित करून तत्कालीन आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्या चौकशीत संबंधित उपअभियंता दोषी आढळला असून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

महापालिका प्रभाग २० मधील नगरसेविका सुजाता पालांडे यांनी विकास कामे व प्रभागातील समस्यांबाबत उपअभियंता समीर दळवी यांच्याशी मोबाईल संपर्क साधला होता. त्यावेळी झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या बाबत सर्वसाधारण सभेत प्रश्‍न उपस्थित करून तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्याबाबत चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागितला होता. त्यात संभाषण व्हायरल केले नसल्याचा जबाबत दळवी यांनी दिला होता. त्यामुळे सायबर सेल्सची मदतही घेण्यात आली होती. मात्र, या संभाषण वरिष्ठांपर्यंत पोहोचले होते. त्यास जबाबदार धरून दळवी यांच्यावर शिस्तभंगप्रकरणी कारवाई करून सक्त ताकीद दिल्याची नोटीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली आहे.

loading image
go to top