मुळा नदीकाठच्या वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी गावांना दक्षतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

मुळशी धरणातून रविवारी (ता. 16) सकाळी अकरा वाजता विसर्ग सुरू केला जाणार आहे.

पिंपरी : मुळशी धरणातून रविवारी (ता. 16) सकाळी अकरा वाजता विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदी काठच्या वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी, बोपखेल, पुण्यातील खडकी, बाणेर, बोपोडी, औंध गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुळशी धरण प्रमुख (टाटा पॉवर) बसवराज मुन्नोळी यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका पूर नियंत्रण कक्ष, पुणे-पिंपरी-चिंचवड, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता पिरंगूट, मुळशी तहसीलदार मुळशी व पोलिसांना कळविले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशी तालुक्यात मुळा नदीवर मुळशी धरण आहे. मुळा नदी मुळशी तालुक्यातून येऊन वाकड व बाणेरच्या शिवेवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पूण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. येथून पुढे त्यांची ओळख मुळा-मुठा अशी होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उद्या रविवारी सकाळी ११ वाजता मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सूरू करण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो. त्यामुळे कृपया धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. विजेवरील मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच, पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन मुन्नोळी यांनी केले आहे.

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warning to mula river's along village wakad, pimple nilakh, juni sangvi, dapodi, khadki, baner, bopodi, aundh