

Satellite Data Revealed the Risk: Moshi Waste Dump Had Been Under Official Scanner
sakal
-ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्प परिसरात कचऱ्याचा ढिगारा कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास केवळ ‘ढिगारा का कोसळला’, एवढ्यापुरता मर्यादित राहणार नाही; तर यापूर्वीच मोशी डेपोबाबत धोक्याचे इशारे विविध सरकारी यंत्रणांनी दिले. पण, जमिनीवरील यंत्रणा कुचकामी ठरल्याचे विविध अहवालांद्वारे समोर आले आहे.