आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो

आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो

पिंपरी, ता. २३ ः ‘‘मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार याद्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो,’’ असे प्रतिपादन लेखक आणि व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.

मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेत ‘जगणे सुंदर आहे’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. आर. माडगूळकर हे होते. तर व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, उद्योजक भगवान पठारे, संघाचे मार्गदर्शक यशवंत आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, ‘‘आयुष्य हा ऊन-पावसाचा, आशा-निराशेचा प्रवास आहे. आयुष्यात येणारी संकटे, अडचणी, नैराश्य, दुःख, सुख, आनंद या सर्व गोष्टीमुळे जगण्याची चव वाढते. दुःखाने माणूस डोळस बनतो आणि अडचणीमुळे अनुभव वाढतात. ज्ञान, प्रज्ञा, व्यासंग आणि सत्संग यामुळे आयुष्याला उजाळा देत समृद्धीकडे वाटचाल करता येते. मृत्यू हे आयुष्याचे अंतिम आणि अटळ सत्य आहे. त्याची भीती न बाळगता आयुष्यात स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य सुंदर बनवण्यासाठी स्वतः सकारात्मक राहून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करता आला पाहिजे.’’ अरविंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. उल्हास झिरपे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com