लोकहो, दंड भरण्यापेक्षा मास्क वापरा!

लोकहो, दंड भरण्यापेक्षा मास्क वापरा!

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दिवसाला चारशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. अनेक जण नियमांचे पालन करीत नाहीत, त्यामुळे पोलिस व महापालिका कर्मचारी दंडात्मक कारवाई करीत आहेत. त्यावरून वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. दंडात्मक कारवाई हौस म्हणून केली जात नाही, तर आपण माणसं चुकतो आहोत, म्हणून कारवाई करावी लागत आहे. कोरोना संसर्गापासून तुम्हाला व तुमच्या परिवाराला वाचवणे, हाच त्यामागील प्रामाणिक हेतू आहे.

गेल्या वर्षभरापासून शहरासह संपूर्ण देशाला कोरोनाने ग्रासले आहे. गेल्यावर्षी आपण लॉकडॉउनचा दीर्घकाळ अनुभवला आहे. त्याचे विपरीत परिणाम देशावर झाले, राज्यावर झाले, तसे प्रत्येक शहरातील, गावातील, गल्लीतील घराघरांत झाले. काहींची नोकरी गेली. काहींचा व्यवसाय बंद पडला. काही कुटुंबांचे खूपच नुकसान झाले. यात काहींना प्राणही गमवावे लागले. जीवनशैली बदलली. कामाचे स्वरूप बदलले. अनेकांची जगण्याची लढाई सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरात शहर परिसरातील दोन हजारांवर व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. एक लाखापेक्षा अधिक व्यक्तींना कोरोनाने पछाडले आहे. अजूनही या स्थितीत बदल झालेला नाही. रुग्णसंख्या वाढतेच आहे. याला जबाबदार कोण? याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही ना! विचार केला असता तर, कदाचित कावाईची वेळ आली नसती. वेळोवेळी प्रशासनाच्या व सरकारच्या सूचनांचे पालन केले असते, सोशल डिस्टसिंग पाळले असते, गर्दी केली नसती, नेहमी मास्क वापरले असते, वेळोवेळी हात धुतले असते, किमान सॅनिटायझर वापरले असते, तर कदाचित पुन्हा रुग्ण वाढले नसते. पण, सरकारने आपल्यासाठी काही प्रमाणात नियम शिथिल केले. त्याचा आपण गैरफायदा घेतोय, असे नाही का वाटत. नियम पाळले असते, तर आज ही स्थिती उद्भवली नसती. पोलिसांना रस्त्यावर थांबावे लागले नसते.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी मास्क नसलेल्या दीड हजार नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेसात लाख रुपये दंड वसूल केला आहे. कारण, मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. आणि रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड वसूल केला जात आहे.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
पोलिस आपल्याला पकडतील. दंड करतील. या भीतीने अनेक वाहनचालक पोलिसांना पाहून सुसाट वाहन पळवताना दिसतात. यामुळे कदाचित अपघात होऊ शकतो. एक लक्षात येत नाही की, पोलिसांनी विनामास्क पकडल्यानंतर पाचशे रुपये दंड भरणा चांगले की, किमान पंचवीस रुपयांचा मास्क वापरणे चांगले. याचा विचार ज्याने त्याने करायचा आहे. परंतु, ‘आम्ही नाही सुधारणार’ याच वृत्तीने अनेक जण वागताना दिसतात. त्यामुळे पोलिसांना व महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागत आहे. त्यात त्यांचा काहीही तोटा नाही. तो त्यांचा नोकरीचा भाग आहे. त्याबद्दल त्यांना त्यांचा पगार मिळणारच आहे. झळ मात्र तुमच्या खिशाला बसणार आहे. आता तर माजी सैनिक अर्थात लष्कराचे निवृत्त जवान आणि दुर्गा ब्रिगेड महिला चौकाचौकात थांबून कारवाई करणार आहेत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. एक काम करा! पंचवीस रुपयांचे मास्क वापरा आणि पावणेपाचशे रुपये वाचवा! काय करायचं, हे तुमचं तुम्‍हीच ठरवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com