‘विकेंड लॉकडाउन’ मुळे पिंपरीत उसळली अभूतपूर्व गर्दी

Pune Lockdown Corona
Pune Lockdown Corona
Updated on

पिंपरी : कोरोनाची स्थिती विदारक बनत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवार आणि रविवार ‘विकेंड लॉकडाउन’ लागू केला आहे. या दोन दिवसांच्या कडक निर्बंधामुळे शुक्रवारी (ता.९) बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. किराणा, भाजीपाला खरेदी सोबतच गुढीपाडवा सणासाठी देखील पूजेचे साहित्य खरेदी करण्यात आले. यासोबतच तळीरामांनीदेखील मद्याचा वाढीव साठा करून ठेवत गुटखा, तंबाखूचीदेखील तजवीज करून ठेवली. बाजारात खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे चौकाचौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. 

कोरोना प्रादुर्भाव काळात देखील गर्दीने बाजार फुलून गेला होता. पिंपरीकॅम्पमधील किराणा दुकानात दररोजच्या तुलनेत दीडपट विक्रीबंदच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने किराणा साहित्य व घरात लागणाऱ्या इतर वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे दररोज होणाऱ्या व्यवहाराच्या तुलनेत दीडपटीने व्यवहार वाढल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच चिकण, मटण आणि मासे विक्रेत्यांकडेही नागरीकांनी गर्दी केली होती. दोन दिवसावर आलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त कपडा खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तोंडाला मास्क बांधलेले नागरिक दुकानात गर्दी करीत असल्याने सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन देखील होत नव्हते. 

हेही वाचा - पुणेकरांनो सवलतींचा गैरवापर नको; लॉकडाऊनमध्ये विनाकारण हिंडणाऱ्यांवर कारवाई
सायंकाळी गर्दीत पडली भर 
बाजारपेठेत शुक्रवारी सकाळपासूनच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यानंतर सायंकाळी तर अधिकच गर्दी वाढली. पिंपरी मार्केटमधील शगुन चौक, साई चौक यासह शहरातील उपनगरात देखील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. 

वाहतुकीची कोंडी 
नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडल्याने रस्त्यांवर तसेच चौकाचौकांत वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. ठिकठिकाणच्या भागात वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com