लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर

लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर

पिंपरी : शहरात कोरोना संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी सोमवार (ता. 13) मध्यरात्रीपासून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुन्हा दहा दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले. यातील पहिले पाच दिवस 14 ते 18 जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. तर, नंतरचे पाच दिवस 19 ते 23 जुलै काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • लॉकडाउनचे पहिले पाच दिवस (ता. 14 ते 18 जुलै) सर्व दुकाने बंद राहतील. त्यानंतरचे पाच दिवस सकाळी आठ ते दुपारी 12 या वेळेत किराणा दुकाने खुली ठेवता येतील. 
  • 65 वर्षांवरील व मधुमेह, रक्तदाब, दमा, यकृत, मुत्रपिंड, कर्करोग, एचआयव्ही बाधित व्यक्ती, गरोदर महिला व दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. 
  • विनाकारण फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल. वाहन जप्त करून परवाना रद्द केला जाईल. 

संपूर्ण बंद 

किराणासह सर्व दुकाने, कंपन्या, क्रिडांगणे, उद्याने, हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट, मॉल, बाजार, सलून, ब्युटी पार्लर, भाजी मार्केट, मंडई, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग, सर्व वाहने, बससेवा, बांधकामे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, डान्सबार, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, लग्न अथवा स्वागत समारंभ, सर्व खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, अन्नपदार्थ घरपोच सेवा. 19 जुलैनंतर काही प्रमाणात शिथिल.

निर्बंधासह सुरू 

दुध विक्री संपूर्ण वेळ, वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा, रुग्णालये, मेडिकल दुकाने 24 तास, शासकीय कार्यालये, अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल पंप (सकाळी 9 ते दुपारी 2), घरपोच गॅस सिलिंडर सेवा, पाणी टॅंकर, 

हे सुरू राहील 

  • मालवाहतूक ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्‍टर 
  • मजुरांच्या निवासाची व्यवस्था साइटवर असल्यास बांधकामांना परवानगी 
  • अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही 
  • सर्व बॅंका, एटीएम सुविधा 
  • औषधे व अन्न उत्पादन, प्रक्रिया व निर्यात उद्योग, पुरवठादार (एमआयडीसी पोर्टलवरून दिलेली परवानगी आवश्‍यक)  

वृत्तपत्र वितरण सकाळी 6 ते 9

वर्तमानपत्रे छपाई व वितरणास परवानगी. मात्र, सकाळी सहा ते नऊ या वेळेत वितरण. तसेच, कार्यालय शासकीय नियमानुसार सुरू राहतील. न्यायालयीन, सरकारी व सरकार अंतिकृत कर्मचारी, अधिकारी, वकील, डॉक्‍टर, नर्स, माध्यम प्रतिनिधी, वैद्यकीय सेवक, दुध विक्रेते, अत्यावश्‍यक सेवा (कृषी, बी- बियाणे, गॅस वितरक, पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशामक, महापालिका कर्मचारी- अधिकारी यांनाच चारचाकी व दुचाकी (स्वतःसाठी) वापरता येणार. ओळखपत्र किंवा आधार कार्ड आवश्‍यक. 

कारखान्यांसाठी... 

  • आयटी कंपन्या 15 टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील. वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला.
  • शहराबाहेरील कंपन्यांना कामगारांसाठी स्वतःचे चारचाकी वाहन किंवा निश्‍चित केलेल्या बसमधून प्रवासाला परवानगी 
  • शहरातील कंपन्या चालू राहतील. कामगारांची वाहतूक पास घेऊन मधूनच करावी 
  • कंपनीतच दहा दिवस निवास व्यवस्था केल्यास संपूर्ण परवानगी 
  • कंटेन्मेंट झोनबाहेरील कामगाराच असावेत 
  • epaas.addl2@pcmcindia.gov.in इ पास येथे उपलब्ध होईल.

ऍप डाउनलोड करा 

सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 'आरोग्य सेतू' व महापालिकेचे "स्मार्ट सारथी ऍप' डाउनलोड केल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य सेतू ऍपद्वारे संसर्गाविषयी सूचना, मेडिकल दुकाने व फ्ल्यू क्‍लिनिकची माहिती मिळते. 

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com