esakal | 'पीएमआरडीए'चा कारभार नेमका कोणाच्या हाती?, अधिकाऱ्यांमध्ये सुरूय कुजबूज
sakal

बोलून बातमी शोधा

'पीएमआरडीए'चा कारभार नेमका कोणाच्या हाती?, अधिकाऱ्यांमध्ये सुरूय कुजबूज
  • कामकाजात बदलाची अपेक्षा 

'पीएमआरडीए'चा कारभार नेमका कोणाच्या हाती?, अधिकाऱ्यांमध्ये सुरूय कुजबूज

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : मेट्रो, रिंगरोड, नगररचना नियोजन व विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हातात एकवटलेले आहे. हे टोलेजंग प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची तत्परता व धाडसी निर्णय तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र, सध्याची विविध प्रकल्पांची कामकाजातील कासवगती पाहता आयुक्तांची पकड ढिली पडत असल्याचे दिसते. वर्चस्व गाजविणारे ठराविक एक-दोनच अधिकारी महत्त्वाच्या प्रकल्पांचे निर्णय व इतर प्रशासकीय निर्णय घेत आहेत. त्यामुळे पीएमआरडीएचा कारभार नेमकं चालवतंय कोण? असा प्रश्‍न पीएमआरडीएच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही पडला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आयुक्त सुहास दिवसे यांनी 13 जुलैला कारभार हातात घेतला. तेव्हापासून अतिरिक्त आयुक्त (प्रशासन) व महानगर नियोजनकार (विकास परवानगी) यांच्याच हातात सध्या कारभार एकवटलेला आहे. काही अधिकारी तर आयुक्तांकडे कामच पडत नसल्याने घरूनच कामाचा भार हाकत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांनी "पीएमआरडीए'त पाऊल ठेवलेले नाही. अनधिकृत बांधकामाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिला अतिरिक्त आयुक्त कार्यालयात एकदाही फिरकलेल्याच नाहीत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या विकास परवानगीचे महानगर नियोजनकार यांच्यावर हायपरलूप, मेट्रो -3 व मेट्रोच्या जागांचे नियोजन, रिंगरोड, टीपी स्कीम, बांधकाम परवानगी, जमीन विकसन निधी प्रकल्प, व्यवहार्यता तफावत निधी अशा तब्बल सात कारभारांचा भार दिलेला आहे. या कामांची विभागणी पीएमआरडीए सुरू झाल्यापासून केलेली नाही. एकाच अधिकाऱ्याकडे एवढ्या कामांचा पदभार असल्याचे कारणही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे इतर विभागाचे अधिकारी नेमके करतात काय? हा प्रश्‍न आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
36 अधिकारी वर्ग एकचे; तरीही कामकाज शून्य 

  • जमीन व मालमत्ता विभाग - अतिरिक्त मुख्य आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी 
  • अनधिकृत बांधकाम - पोलिस अधीक्षक, अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक 
  • नियोजन विभाग - महानगर नियोजनकार, दोन नियोजनकार 
  • बांधकाम परवानगी - मुख्य अभियंता, चार नियोजनकार, सहा सहायक नगररचनाकार 
  • लवाद - दोन सहायक संचालक नगररचनाकार, दोन सहायक नगररचनाकार 
  • अग्निशमन - मुख्य अग्निशमन अधिकारी 
  • प्रशासन - अतिरिक्त आयुक्त 
  • अभियांत्रिकी विभाग- अधीक्षक अभियंता-3, कार्यकारी अभियंता - 7, उपअभियंता - 3, 


रस्ते व गटाराची कामे सुरू आहेत. सध्या 450 कोटींची कामे प्रगतिपथावर आहेत. अधिकारी सर्वजण काम करताहेत. रिंगरोडच्या बैठका सुरू आहेत. टिपी स्कीमची कामे सुरू आहेत. जम्बो कोविड सेंटरचे काम महिनाभर सुरू होते. घरांचे कामकाज सुरू आहे. हे बाहेर दिसून येत नाही. 
- सुहास दिवसे, आयुक्त, पीएमआरडीए