‘रिंगरोडऐवजी पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करा’

गावांना जोडणाऱ्या पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Ring Road
Ring RoadSakal

सोमाटणे : रिंगरोडऐवजी गावांना जोडणाऱ्या पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करा, अशी मागणी सांगवडे, दारुंब्रे व धामणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

‘पीएमआरडीए’ने मारुंजी, सांगवडे, दारुंब्रे, धामणेमार्गे उर्से हा ६५ मीटर रुंदीचा रिंगरोड प्रस्तावित केला. याबाबत ३० ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांकडून हरकती मागविल्या आहेत. पीएमआरडीएच्या मागणीनुसार, सध्या शेतकऱ्यांनी हरकती अर्ज जमा करण्याचे काम सुरू केले असून, सर्व शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध दर्शविला आहे. सरकारने यापूर्वी पवन मावळातील शेतकऱ्यांच्या जमिनी द्रुतगती मार्ग, क्रिकेट स्टेडियम, पवना, कासारसाई, मळवंडी धरणासाठी घेतल्या आहेत. (Pcmc News)

Ring Road
घरकूलच्या नावाखाली फसवणुक; आरोपी अटकेत

त्यात नव्याने ‘पीएमआरडीए’चा मारुंजी, सांगवडे, दारुंब्रेमार्गे उर्से ६५ मीटर रुंदीचा; तर ‘एमएसआरडीसी’ने पिंपळोली, पाचाणे, चांदखेड, बेबडओहोळ, परंदवडीमार्गे उर्से ११० मीटर रुंदीचा, असे दोन रिंगरोड प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पांमुळे पवन मावळातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

Ring Road
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी १८७ नवीन रुग्ण

त्यामुळे सरकारने मारुंजी, सांगवडे, दारुंब्रे, उर्से मार्गाचा रिंगरोड करण्याऐवजी गावांना जोडणाऱ्या पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी शेतकरी पोपट राक्षे, रमेश राक्षे, संभाजी राक्षे, रामनाथ गराडे, कांतिलाल सोरटे, सोमनाथ वाघोले, तानाजी वाघोले, नंदू आगळे, नामदेव आमले, कृष्णा आमले, प्रदीप सावंत आदींसह सांगवडे, दारुंब्रे व धामणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com