esakal | चिखलीत घरात शिरून महिलेला मारहाण करून हिसकावले दागिने
sakal

बोलून बातमी शोधा

The woman was beaten and the jewellery was snatched from house.jpg

३१ मार्चला सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी नंदकुमार हा फिर्यादी यांच्या घरी तोंडाला रंग व मास्क लावून आला. फिर्यादी यांचा कामगार यास “तू का तुझ्याकडे घेतलीस?’ असे म्हणत फिर्यादी आरती यांना शिवीगाळ केली.

चिखलीत घरात शिरून महिलेला मारहाण करून हिसकावले दागिने

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : घरात शिरून मारहाण करीत महिलेच्या अंगावरील दागिने चोरट्याने हिसकावले. ही घटना मोरेवस्ती, चिखली येथे घडली. नंदकुमार कोहळे (रा. स्वप्ननगरी कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरती भागवत शिंदे (वय २५, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

३१ मार्चला सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी नंदकुमार हा फिर्यादी यांच्या घरी तोंडाला रंग व मास्क लावून आला. फिर्यादी यांचा कामगार यास “तू का तुझ्याकडे घेतलीस?’ असे म्हणत फिर्यादी आरती यांना शिवीगाळ केली. त्यानंतर तोंडावर नखाने ओरखडले. किचनमधील पातेले आरती यांच्या डोक्‍यात मारले. त्यानंतर लोखंडी कपाटाला आपटून फिर्यादी यांचे दोन्ही हात धरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, बदाम व कानातील टॉप्स असे 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image