Crime News : ‘त्या’ महिलेचा अपघात नव्हे खून; दोन महिन्यांनंतर तपासात समोर आले सत्य

दोन महिन्यांपूर्वी वाकडमधील काळाखडक येथे टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अपघाताचा गुन्हाही दाखल झाला.
Crime
Crimesakal

पिंपरी - दोन महिन्यांपूर्वी वाकडमधील काळाखडक येथे टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अपघाताचा गुन्हाही दाखल झाला. मात्र, अधिक तपासात हा अपघात नसून, घातपात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जुन्या वादातून टोळक्याने महिलेचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. वाकड पोलिसांनी कसून तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

लता संतोषकुमार कांबळे (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती संतोषकुमार हे जखमी आहेत. तर या गुन्ह्यात पोलिसांनी आनंद किशोर वाल्मीकी (वय २९), परशुराम ऊर्फ परश्या सुनील माने (वय २४. दोघेही रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), रोहित नागनाथ गायकवाड (वय २३, रा. शेवाळवाडी, शेवाळे चौक, हडपसर) यांना अटक केली असून, शाहरुख युनूस खान (रा. कालखंडक झोपडपट्टी, वाकड) हा फरारी आहे.

यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल आहे. ३ मार्च २०२४ रोजी काळाखडक येथे पिकअप टेम्पोने धडक दिल्याने लता कांबळे यांचा मृत्यू झाला. मात्र, हा घातपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये घटनेपूर्वी एक टेम्पो तीन ते साडे तीन तास घटनास्थळाच्या परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे दिसून आले.

टेम्पो चालकासह इतर आरोपींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. लता व त्यांचे पती रस्त्याने पायी येत असल्याचे दिसताच भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिल्याचे निरीक्षणात निष्पन्न झाले. हा गुन्हा अतिशय नियोजनबद्ध व केल्याचे समोर आल्याने कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान, टेम्पोचालक रोहित ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा सराईत गुन्हेगार आनंद वाल्मीकी, परशुराम माने यांच्यासह केल्याची माहिती दिली. लता कांबळे याच्याशी असलेल्या पूर्वीच्या वादातून त्यांचा खून केल्याचे सांगितले. तसेच हा खून आरोपींचा साथीदार शाहरुख खान याच्यासह कट करून केल्याचे समोर आले. या गुन्ह्यात पाळत ठेवण्यासाठी एका अल्पवयीन मुलगा असल्याचेही समोर आले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शाहरुख खान याच्यावर दुसऱ्यांदा ‘मोका’

टोळीप्रमुख शाहरुख खान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. आता पुन्हा त्याच्यावर ‘मोका’ कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यासह त्याचे साथीदार अनंत वाल्मीकी, परशुराम माने, रोहित गायकवाड यांच्यावरही ‘मोका’ कारवाई झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com