esakal | महिला ‘स्टार्ट-अप’ला लाखमोलाची संधी

बोलून बातमी शोधा

PCMC-Smart-Sarthi-App

तुम्ही महिला आहात... केवळ महिलांनी ‘स्टार्ट-अप’ सुरू केलंय... तुमचं ‘स्टार्ट-अप’ महिलांद्वारेच चालविलं जातंय... मग, तुम्हाला एक लाख रुपयांचे साहाय्य मिळविण्याची संधी उपलब्ध आहे... शिवाय ‘पीसीएमसी हिरकणी’ सन्मानसुद्धा... ही संधी तुमच्यासाठी आणली आहे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने.

महिला ‘स्टार्ट-अप’ला लाखमोलाची संधी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - तुम्ही महिला आहात... केवळ महिलांनी ‘स्टार्ट-अप’ सुरू केलंय... तुमचं ‘स्टार्ट-अप’ महिलांद्वारेच चालविलं जातंय... मग, तुम्हाला एक लाख रुपयांचे साहाय्य मिळविण्याची संधी उपलब्ध आहे... शिवाय ‘पीसीएमसी हिरकणी’ सन्मानसुद्धा... ही संधी तुमच्यासाठी आणली आहे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने. त्यासाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीही ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप’वर...चला तर मग, ‘ॲप’वर जाऊ या! आणि सहभागी होऊन अर्थसाहाय्य आणि सन्मानही मिळवू या! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकविसाव्या शतकात अनेक महिला आपले करिअर, उद्योग, व्यवसाय सांभाळून कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडत आहेत. एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होत आहेत. अशा कर्तबगार महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठी मातीमधील आदर्श माता आणि कर्तबगार स्त्री असलेल्या ‘हिरकणी’ यांच्या नावाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातर्फे ‘पीसीएमसी हिरकणी’ सन्मान देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल; जुगार खेळताना अटक

नामांकनासाठी १० एप्रिल
‘पीसीएमसी हिरकणी’ सन्मानासाठी नामांकन भरण्यास आठ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. यामध्ये १० एप्रिलपर्यंत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजेस’च्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ परीक्षक मंडळ करणार आहे. त्यांच्यातर्फेच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

Cyber Attack : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला; हल्लेखोरांनी मागितली बिटकॉइनची खंडणी

महिला सुरक्षा स्पर्धा
केवळ महिलांनी सुरू केलेल्या, महिलांद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट ‘स्टार्ट-अप’ला सामाजिक संस्थांकडून एक लाख रुपयांचे सहाय्य दिले जाणार आहे. तसेच, महिला सुरक्षेसाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना, उपकरण किंवा तत्सम व्यवस्थेकरता ५० हजार रुपयांची सहाय्यता देण्यात येणार आहे. सुरक्षिततेविषयी असलेल्या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुषदेखील सहभागी होऊ शकतात.

Edited By - Prashant Patil