दापोडीत इमारतीवरून पडून मजूर महिलेचा मृत्यू

बांधकाम साईटवर काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मजूर महिलेचा मृत्यू
women Worker dies falling from building Dapodi pimpri
women Worker dies falling from building Dapodi pimprisakal

पिंपरी : बांधकाम साईटवर काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मजूर महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम साईट मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दापोडी येथे घडली. जयश्री प्रकाश चलवारे (वय ४५, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी)) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शंकर प्रकाश चलवारे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार जुबेर गाझी व फजल खान (दोघेही रा. दापोडी) व इतर दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींची दापोडी येथे कडबा कुट्टीजवळ बांधकाम साईट सुरु आहे. येथे जयश्री या काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com