देहूरोडमध्ये टोळक्याकडून तलवार, सत्तूरने प्राणघातक हल्ला

सहा जणांना अटक
gang attack
gang attackSakal

पिंपरी - भांडणावरून टोळक्याने एकाच कुटूंबातील सदस्यांवर तलवार, सत्तूरने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. ही घटना देहूरोड येथे घडली. याप्रकरणी वीर शाम डूलगज (रा. पारशी चाळ, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल रोहिदास टाक (वय ३३), सुनील उर्फ गुगा रोहिदास टाक (वय ३१), हरीश रोहिदास टाक (वय ३०) व तीन महिला याना अटक केली असून अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे.

नुकत्याच झालेल्या भांडणावरून आरोपी अनिल याने फिर्यादीवर पालघनने वार करून जखमी केले. तर इतर आरोपींनी फिर्यादीचे चुलते संदीप डूलगज, आत्या दीपा भिगानीया, आजोबा रामकिशन डूलगज यांनाही पालघन , हॉकी स्टिक , तलवार , सत्तूर तसेच लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com