जुनी सांगवीतील 'या' पुतळ्याच्या सुशोभीकरणाला कोरोनाचं ग्रहण!

रमेश मोरे 
Tuesday, 7 July 2020

  • कोरोना संकट दिवसेंदिवस आधिक गडद होताना दिसत आहे.

जुनी सांगवी (पुणे) : कोरोना संकट दिवसेंदिवस आधिक गडद होताना दिसत आहे. माणसं या संकटामुळे मेटाकुटीस आले आहेत. कडक लॉकडाउननंतर काही प्रमाणात आता शिथिलता दिल्यावरही परिस्थिती अवघड झाली आहे. सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यातून तग धरायचा कसा, हा सर्व सामान्यांसमोर प्रश्न पडला आहे. माणसं महामारीच्या संकटापुढे हतबल झाली आहेत. हाताला काम नाही. असंघटीत घरेलू कामगार, बांधकाम मजूर, गवंडी, रंगारी, छोटा लघू उद्योजक, सेवा उद्योग बंद असल्याने सर्व क्षेत्रातील कामगार माणसांची या काळात परवड झाली आहे. माणसं तर माणसं मात्र, चौकातील पुतळाही हे कोरोनाचे ग्रहण कधी सुटणार, असा प्रश्न विचारत असल्याचा भास जुनी सांगवी येथील वसंतदादा पाटील पुतळ्याजवळ आल्यावर मनात आल्याशिवाय राहात नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

जुनी सांगवी दापोडीला जोडणाऱ्या पवनानदी वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळील व जुनी सांगवीच्या पुर्व प्रवेशद्वारावर असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व पद्मभूषण वसंतदादा पाटिल यांचा या चौकात गेली अनेक वर्षांपासून अर्धआकृती पुतळा आहे. या चौकातून पुणे महानगर व परिसरात पीएमपी बसच्या जवळपास पन्नास फेऱ्या होतात. मुख्य बसस्थानकालगत गेली अनेक वर्षांपासून येथील चौकात हा पुतळा सांगवीच्या सौंदर्यात भर घालत दिमाखात उभा आहे. मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सुशोभिकरणाच्या नावाखाली याचे काम रखडल्याने तो झाकला आहे. काही प्रमाणात काम सुरू होऊन पुन्हा लॉकडाउन लागल्याने अर्धवट काम तसेच राहिले. परिणामी हा पुतळा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून झाकलेला आहे. 

हेही वाचा- Video : कोरोनाचा कहर तरी, शरद पवारांनी कार्यकर्त्याला श्रद्धांजली द्यायला गाठलं त्याचं घर, वाचा सविस्तर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सांगवीकरांचा वाहतुकीचा हा मुख्य चौक आहे. त्यामुळे या चौकात आल्यावर पुतळ्याला कापडाने झाकलेले दिसल्याने कोरोना संकट कधी टळणार, असा प्रश्न हा पुतळा विचारत तर नाही ना, असे या पुतळ्याकडे पाहिल्यावर मनात आल्याशिवाय राहात नाही. हा पुतळा तत्कालिन सांगवी पुतळा समितीच्या वतीने महापालिकेस भेट देण्यात आला होता. याचे २३ मे १९८५ रोजी तत्कालिन विधान परिषद अध्यक्ष जयवंतरावजी टिळक, दुग्धविकासमंत्री अनंतरावजी थोपटे, लक्ष्मणशास्री जोशी, अशोकराव मोहोळ आदींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी सांगवीचे पुर्वेचे प्रवेशद्वार म्हणून याची ओळख आहे. येथील चौक सुशोभिकरण कामाच्या निविदा काढून पालिका स्थापत्य विभागाकडून या चौकाच्या सुशोभिकरणाचे काम गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. सुमारे अठरा लाख रूपये अपेक्षित खर्चात मेघडंबरी, ग्रेनाईट बसविणे, विद्यूतीकरण व ईतर सुशोभिकरणाच्या गोष्टी येथे करण्यात येणार आहेत. काही काम झाले, मात्र लॉकडाउनमध्ये पुन्हा रखडले. या बाबत स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन सानप म्हणाले, की येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work pending to statue of vasantdada patil in juni sangvi