सुटी न दिल्याने कामगाराने केला ठेकेदाराचा खून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

जांबे येथील ठेकेदाराच्या खून प्रकरणातील आरोपीला हिंजवडी पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली.

पिंपरी : जांबे येथील ठेकेदाराच्या खून प्रकरणातील आरोपीला हिंजवडी पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. छटपुजेला गावी जाण्यासाठी सुटी न दिल्याने कामगारानेच ठेकेदाराचा खून केल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अरविंद नैपाल चौहान उर्फ यादव (वय 35, रा. जांबे, मूळगाव-देवरीकलान, ता. मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गणपत सदाशिव सांगळे (वय 24, रा. जांबे) असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. सांगळे हे ठेकेदाराचे काम करायचे. तर आरोपी चौहान हा त्यांच्याकडे काम करून त्यांच्यासोबत एकाच रूममध्ये रहायचा. दरम्यान, सांगळे यांचा खून झाल्याची घटना 27 नोव्हेंबरला उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या तपासावरून हा खून चौहान यानेच केल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर तो उत्तरप्रदेशला त्याच्या मूळगावी पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हिंजवडी पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशला रवाना झाले. नक्षलग्रस्त व जंगल परिसरात असलेल्या चौहान याच्या घराजवळ स्थानिक पोलिसांची मदत घेऊन वेषांतर करून सापळा रचला. चौहान हा त्याच्या पत्नीसह पळून जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याच्याकडे सखोल तपास केला असता छटपुजेला गावी जाण्यासाठी सुटी न दिल्याने सांगळे यांचा खून केल्याचे समोर आले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worker killed contractor for not giving leave