Bhairavnath Maharaj Utsav 2025 : श्री भैरवनाथ उत्सवात नामांकित पैलवानांच्या कुस्त्या व बैलगाड्यांचा थरार

Bhairavnath Maharaj Utsav 2025 : भोसरीतील भैरवनाथ महाराज उत्सवामध्ये याही वर्षी कुस्तीच्या झुंज आणि बैलगाडी रेस होणार आहेत. ग्रामस्थांनी पचांग सांगून परंपरा जपली आणि उत्सवाच्या तयारीची समीक्षा केली.
Bhairavnath Maharaj Utsav 2025
Bhairavnath Maharaj Utsav 2025Sakal
Updated on

भोसरी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवातील आखाड्यात नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांची झुंज कुस्तीगीर शौकिनांना अनुभवता येणार. त्याचप्रमाणे बैलगाड्यांचा थरारही पाहता येणार आहे. पाडव्यानिमित्त घेण्यात आलेल्या भोसरी ग्रामस्थांच्या बैठकीत पानांच्या विड्याद्वारे पचांग सांगत ग्रामस्थांनी परंपरा जपली आहे. बैठकीत १५ व १६ एप्रिल रोजी होणाऱ्या उत्सवाचा आढावाही घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com