
अश्विनी पवार
पिंपरी : महापालिका रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या बहुतांश माता सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातील असतात. सुदृढ नसल्याने त्यांना दूध येत नाही. अशा वेळी शिशूंना आईचे दूध मिळावे म्हणून पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू करण्याचा प्रस्ताव बालरोग विभागाने पाठवला होता. मात्र वैद्यकीय विभागाकडे आवश्यक निधीच नसल्याने निविदा प्रक्रियाच सुरू झालेली नाही.