
पिंपरी : जागतिक योग दिन यंदाच्यावर्षी सामूहिक प्रकारात न करता पहिल्यांदाच ऑनलाइन साजरा होणार आहे. त्यासाठी योगसाधक, योगशिक्षक आणि योगपटू विशेष ऍपचा वापर करणार आहेत. त्याद्वारे, योग, प्राणायाम, ध्यान यावर व्याख्याने आणि योगसाधना केली जाणार आहे.
रविवारी (ता. 21) सर्वत्र जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. मात्र, यंदा त्यावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे, सुरक्षित सामाईक अंतर कायम ठेवण्यासाठी सामूहिक योगसाधना टाळण्यात आली आहे. विविध योग विषयक संस्था-संघटनांनी विशेष ऍपचा वापर करुन योग दिन ऑनलाइन साजरा करण्याचे ठरविले आहे.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
योग विद्या धाम, पिंपरी-चिंचवडचे केंद्रप्रमुख प्रमोद निफाडकर म्हणाले, "योग विद्या गुरुकुल, नाशिक आणि आमच्या संस्थेच्या सहकार्याने, 21 जूनला "कोविड 19 प्रतिबंध के लिए योगसाधना' याविषयावर ऑनलाइन राष्ट्रीय योग संमेलन भरविण्यात येणार आहे. योग विद्या गुरुकुलचे अध्यक्ष योगाचार्य डॉ.विश्वास मंडलिक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाचे संचालक डॉ. ईश्वर बसवरेड्डी यावेळी शुभेच्छा देणार आहेत. या दोघांशिवाय, 10 वक्ते योग, ध्यान, प्राणायाम आदी विषयांवर विचार मांडणार आहेत.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्हा योग संस्थेचे अध्यक्ष मनोज काळे म्हणाले, "विशेष ऍपच्या मदतीने आमच्या संस्थेचे 43 योग प्रशिक्षक, 36 राज्यस्तरीय पंच हे त्यांच्या योगसाधकांसमवेत ऑनलाईन योगासने सादर करणार आहेत. एलिट फिटनेस अकादमीचे 14 वर्षांखालील सुमारे 120 योगपटूही त्यामध्ये भाग घेणार आहेत.''
पुणे डिस्ट्रिक्ट योगा ऍन्ड फिटनेस इन्स्टिट्यूटचे संस्थापक चंद्रकांत पांगारे म्हणाले, "योगदिनी चार कार्यक्रम होणार आहेत. बजाज प्राणा, ज्ञानप्रबोधिनी, निगडी, महाराष्ट्र योग असोसिएशन आणि योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम ऑनलाईन होणार आहेत.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.