तरुणीनं लग्नास नकार दिल्याने तरुणानं उचललं हे मोठं पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

लग्न ठरलेले असताना किरकोळ कारणावरून लग्नास नकार दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरी : लग्न ठरलेले असताना किरकोळ कारणावरून लग्नास नकार दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भरत कृष्णा तळपे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. मृत भरत यांचे वडील कृष्णा केशव तळपे (वय 55, रा. घंगाळदरे, ता. जुन्नर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भरत यांचे काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी लग्न ठरले होते. लग्नाची तिथी काढण्यासह विविध कार्यक्रमांची तयारी सुरू होती. 

दरम्यान, किरकोळ कारणावरून तरुणीने भरत यांना लग्नास नकार देत मानसिक त्रास दिला. या त्रासामुळे भरत यांनी भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील देवकर वस्तीतील कॉलनी क्रमांक एक येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी संबंधित तरुणीवर गुन्हा दाखल केला असून, तिला अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man commits suicide by refusing marriage at bhosari

Tags
टॉपिकस
Topic Tags: