आयटीमधील 'यंग मदर्स'च्या मागणीवर होऊ शकतो विचार...काय आहे मागणी...वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

लॉकडाउन हळूहळू शिथिल होऊ लागला असला, तरी कोरोनाचे संकट मात्र, काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणींची चिंता वाढली आहे.

पिंपरी : लॉकडाउन हळूहळू शिथिल होऊ लागला असला, तरी कोरोनाचे संकट मात्र, काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणींची चिंता वाढली आहे. कोरोना पूर्णपणे जाईपर्यंत आम्हाला 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी आयटी संघटनांकडे केली आहे. तर, महिला आयटीयन्सकडून केलेली सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्राद्‌वारे कळवण्यात आली असल्याने येत्या काही दिवसांमध्ये त्यासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आयटी समितीचे सदस्य पवनजित माने यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तिसरा लॉकडाऊन संपल्यानंतर चौथ्या लॉकडाउनमध्ये हळूहळू शिथिलता येऊ लागली आहे. आयटी पार्कमधल्या कंपन्यादेखील पूर्ववतपणे सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आयटी कंपन्यांचे कॅम्पसमध्ये पुन्हा आयटीयन्सची संख्या वाढलेली दिसेल. दुसरीकडे कोरोनाचे संकट कमी होत नसल्यामुळे आयटी कंपन्यात काम करणाऱ्या यंग मदर्सना चिंता सतावू लागली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या महिलांची मुले सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत आहेत. त्यांना कंपन्यांनी कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे जाईपर्यंत वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. या महिला कर्मचारी कंपनीमध्ये आल्यास त्यांच्या मुलांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या आयटी कंपन्यांमधील पाळणाघरे देखील बंद आहेत. येत्या काळात शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केल्यास काम कसे करायचे, हा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आयटीमधील महिलांना ही सवलत काही काळासाठी देण्याची सूचना या महिलांकडून करण्यात आल्याचे माने यांनी नमूद केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

  • आयटी कंपन्यांची संख्या : 350 ते 400 
  • काम करणाऱ्या आयटीयन्सची संख्या : सुमारे 6,00,000 
  • महिला कर्मचाऱ्यांची संख्या : सुमारे 30 टक्‍के (सुमारे 1,80,000) 
  • यंग मदर्सची संख्या : सुमारे 40 ते 50 हजार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young mothers' demand for work from home in IT at hinjewadi