हिंजवडीत टोळक्याकडून तरुणांना मारहाण; वेळीच पोलिस आल्याने झाली सुटका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

  • मारहाणीनंतर एका तरुणाला आरोपी जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून नेत होते.

पिंपरी : भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात निघालेल्या दोघा तरुणांना टोळक्‍याने 'तुम्हाला लय मस्ती आली आहे का', असे म्हणत बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर एका तरुणाला आरोपी जबरदस्तीने दुचाकीवरून पळवून नेत होते. त्यावेळी पोलिस आल्याने तरुणाला दुचाकीवरून ढकलून आरोपी पसार झाले. ही घटना हिंजवडी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमर अविनाश आरे, रणजित उत्तम शेरे, मुकेश (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी तपन अधीर बिसवास (रा. हिंजवडी गावठाण, मूळ-पश्‍चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. 19) सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी व त्यांचे मित्र सागर कविराज, बिस्वजित सरकार हे पहाटे झालेल्या भांडणाबाबत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात होते. त्यावेळी हिंजवडी रोडवरील जयरामनगर येथे समोरून आलेल्या आरोपींनी 'तुम्हाला लय मस्ती आली आहे का? तुमचा माज उतरवतो', असे म्हणत फिर्यादीसह त्यांच्या मित्रांना हाताने मारहाण केली. तसेच, आरोपी अमर वारे याने स्टंम्पने मारहाण केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सागर कविराज यांना मारण्यासाठी आरोपी त्यांना दुचाकीवर बसवून पळवून नेत असतानाच समोरून पोलिस आले. पोलिसांना पाहताच कविराज यांना गाडीवरून ढकलून आरोपी पसार झाले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youngsters beaten by gangs at hinjewadi