पिंपरीत युवक कॉंग्रेस उतरली रस्त्यावर; उत्तर प्रदेश घटनेचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

उत्तर प्रदेश येथील हाथरस तालुक्‍यातील बूलगाडी या गावामध्ये झालेल्या युवतीवरील सामूहिक अत्याचार व हत्याकांडाचा युवक कॉंग्रेस कडून निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

पिंपरी : उत्तर प्रदेश येथील हाथरस तालुक्‍यातील बूलगाडी या गावामध्ये झालेल्या युवतीवरील सामूहिक अत्याचार व हत्याकांडाचा युवक कॉंग्रेस कडून निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

सांगवी येथील स्व.वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ युवक कॉंग्रेसच्यावतीने निषेध सभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अनिल सोनकांबळे, गिरिधर माने, ओंकार पवार, श्रेयस बायत, ओम चौधरी, रोहित जगताप आदि उपस्थित होते. 

युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ""युवतीवर झालेल्या सामूहिक अत्याचार व हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. एवढी भयानक घटना घडूनही पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशिलता समाजात चीड निर्माण करणारी आहे. यावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा खरा चेहरा समोर येतोय.

कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती यावरून स्पष्ट होते. वास्तविक पाहता या भयावह परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे. अशी प्रमुख मागणी आम्ही करत आहोत. त्वरित पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करावे व या प्रकाराची न्यायालयीन प्रकिया जलदगती न्यायालयात करावी. अन्यथा अधिक तीव्रतेने जनआंदोलन छेडण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress protests the incident in Uttar Pradesh