
धारदार हत्याराने वार करून दोन मित्रांनी तरूणाचा खून केल्याची घटना नेरे येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पिंपरी : धारदार हत्याराने वार करून दोन मित्रांनी तरूणाचा खून केल्याची घटना नेरे येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गणेश रामदास पिंजण (वय 35, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि.पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच, नवनाथ शेडगे, ऋषिकेश भिंताडे (दोघेही
रा. कासारसाई) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश रामदास पिंजण यांनी फिर्याद दिली आहे. मृत गणेश व आरोपी मित्र होते.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, आरोपी मित्रांनी गणेश यांच्यावर धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह नेरेतील दत्तवाडी येथे मोकळ्या मैदानात टाकला. या
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.