
मराठी कलाविश्वात मानाचा समजला जाणाऱ्या फिल्मफेअरने फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२५ च्या १०व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. या सोहळ्यासोबतच, मराठी सिनेमातील उत्कृष्ट प्रतिभेचा सन्मान करण्याच्या फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या या रोमांचक प्रवासाचे एक दशक पूर्ण होत आहे. १० जुलै २०२५ रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात, १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना आणि उत्कृष्ट कलाकृतींना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.