Miss World 2025 : सौंदर्यवतींच्या स्वागतासाठी हैदराबाद नगरी सज्ज; जगत सुंदरी स्पर्धेचे उद्या उद्घाटन
Hyderabad Hosts MissWorld : हैदराबादमध्ये बुधवारपासून (ता. ७) ७२ वी जगत सुंदरी (Miss World) स्पर्धा सुरू होणार आहे. जगभरातून आलेल्या १४० सौंदर्यवतींच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजविण्यात आले आहे.
हैदराबाद : तेलंगणची राजधानी हैदराबाद ७२ व्या जगत सुंदरी स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. शहरात ही स्पर्धा बुधवारपासून (ता.७) सुरू होणार आहे. यातील स्पर्धक शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.